“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”

Namrata Patil

Updated on: Dec 06, 2019 | 7:13 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार हे विसरता कामा नये असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं (Mahadev jankar on Pankaja Munde) आहे.

पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार

औरंगाबाद : “भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार हे विसरता कामा नये,” असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं (Mahadev jankar on Pankaja Munde) आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जानकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य (Mahadev jankar on Pankaja Munde) केलं.

महादेव जानकर यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “एक लक्षात ठेवा, पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार हे विसरता कामा नये. आता काही लोकांना असे वाटत असेल तर ठिक आहे.”

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आपली पुढील दिशा स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. याबाबत जानकर म्हणाले, “येत्या 12 डिसेंबरला माजी दिवंगत मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस असतो. त्या दिवशी आम्ही सर्वच गोपीनाथ गडावर (Mahadev jankar on Pankaja Munde) जातो.”

“विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेचा पराभव झाल्यानंतर ताई काही लोकांशी बोलल्या नाहीत. त्यांना अनेक मॅसेज आले. त्यामुळे त्या म्हणाल्या, मी तिथे बोलेन,” असेही महादेव जानकर म्हणाले.

“पण काहीही होणार नाही. ताईंनी फेसबुक पोस्टमध्ये मावळे म्हटलं आहे. पण आता मावळे काय आपण प्रत्येकाला लिहितो. त्या भाजपच राहणार असून त्या कधीही पक्षाच्या बाहेर पडणार नाही,” असा विश्वासही महादेव जानकर यांनी व्यक्त (Mahadev jankar on Pankaja Munde) केली.

दरम्यान पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

संबंधित बातम्या :

अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, पंकजांची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल : संजय राऊत

आधी फेसबुक पोस्ट, आता ट्विटरवर भाजपचा नामोनिशाण नाही, पंकजा मुंडेंचा पुढचा प्रवास ठरला?

पुढचा प्रवास ठरवण्याची वेळ आली आहे, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI