‘आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या’, चंद्रकांत पाटलांच्या मागणीवर पंकजा मुंडेंची भूमिका काय?

चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या या राजीनाम्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:09 PM, 28 Feb 2021
'आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या', चंद्रकांत पाटलांच्या मागणीवर पंकजा मुंडेंची भूमिका काय?
धनंजय मुंडे पंकजा मुंडे

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांची अखेर विकेट पडली आहे. राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. त्यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या या राजीनाम्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिलीय.(Pankaja Munde’s reaction in Sanjay Rathore and Dhananjay Munde case)

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आलाय. आता करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्यावर पंकजा मुंडे यांनी “एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही,” असं ट्वीट केलंय. पंकजा मुंडे यांचं हे ट्वीट म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला पाठिंबाच असल्याचं बोललं जात आहे.

सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्ता आपल्या महाराष्ट्राला शोभणार नाही, हे पंकजा मुंडे यांचं वाक्य धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा आणि करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांकडे सूचक इशारा करणारं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यापूर्वीही पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं होतं.

पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया

“नैतिक, कायदेशीर आणि तात्विकदृष्या या गोष्टींचं समर्थन मी करु शकत नाही. मात्र, अशा गोष्टींमुळे एखाद्या कुटुंबाला, कुटुंबातील मुलांना काहीही कारण नसताना त्रास होतो. मी महिला बालकल्याणमंत्री म्हणून काम केलं आहे. एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

‘तपास योग्य दिशेनंच, दोषीला कठोर शिक्षा देणार’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर; सीएम म्हणतात, तो काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही!

Pankaja Munde’s reaction in Sanjay Rathore and Dhananjay Munde case