AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राच्या कृषी आणि कामगार कायद्याविरोधात शेकाप आक्रमक, 26 नोव्हेंबरला भारतबंदची हाक

शेकाप आणि अन्य शेतकरी संघटनांच्या वतीनं आज पनवेल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी शेकापचे नेते जयंत पाटील, बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी भूमिका राबवल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

केंद्राच्या कृषी आणि कामगार कायद्याविरोधात शेकाप आक्रमक, 26 नोव्हेंबरला भारतबंदची हाक
sagar joshi
sagar joshi | Updated on: Nov 21, 2020 | 4:31 PM
Share

पनवेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी आणि कामगार कायद्यांविरुद्ध शेतकरी कामगार पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पनवेल जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकापनं मोर्चा काढला. तर शेकापसह काही शेतकरी संघटनांकडून 26 नोव्हेंबरला भारतबंदची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी धोरण अवलंबवल्याची टीका यावेळी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. (Shetkari Kamgar party protest against the Central Government’s Agriculture and Labor Act at the Collector’s Office)

केंद्र सरकारनं नुकत्याच पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, अकाली दलासह देशभरात अनेक पक्ष, संघटना आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेस आणि अकाली दलाकडून या कायद्याला विरोध करण्यासाठी अनेक ट्रॅक्टर रॅली काढण्यात आल्या. महाराष्ट्रातही अनेक पक्ष, संघटना या कायद्याला विरोध करत आहेत. त्यात आता शेकाप आणि काही शेतकरी संघटनांनी उडी घेतली आहे.

आज शेकाप आणि अन्य शेतकरी संघटनांच्या वतीनं आज पनवेल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी शेकापचे नेते जयंत पाटील, बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी भूमिका राबवल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तर केंद्र सरकार 360 डिग्रीमध्ये कायदे बदलायला निघाल्याचा आरोप बाळाराम पाटील यांनी केला आहे.

‘राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी’

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या कायद्यामध्ये शेतमाल खरेदीच्या व्यवहारासाठी किमान आधारभूत किंमत अनिवार्य करण्यासह शेतकरी हिताच्या विविध तरतुदींचा समावेश असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील मागणीचे पत्र दिले. त्यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. या कायद्यांमुळे तेथील शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा नवीन कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही; काँग्रेसचा दावा

भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारला कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसने कृषी कायद्यांच्या विरोधात 6 नोव्हेंबरला सांगलीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते.

संबंधित बातम्या:

राज्यघटनेनुसार कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही; काँग्रेसचा दावा

केंद्राचा कृषी कायदा राज्यात नको, महाराष्ट्र सरकारनं नवा कायदा करावा: आशिष देशमुख

‘राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी’

Shetkari Kamgar party protest against the Central Government’s Agriculture and Labour Act at the Collector’s Office

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...