भाजपला पुन्हा धक्का, दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

भाजपचे पदाधिकारी राहिलेल्या संजय साडेगावकर यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला (Parbhani BJP Sanjay Sadegaonkar Shiv Sena)

भाजपला पुन्हा धक्का, दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
भाजप नेते संजय साडेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 5:05 PM

परभणी : भाजप नेते संजय साडेगावकर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती धरला. संजय साडेगावकर हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आहेत. राठोड यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Parbhani BJP Leader Sanjay Sadegaonkar Joins Shiv Sena)

परभणी शहरात शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयासमोरील जागेत पेंडॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

भाजपचे पदाधिकारी राहिलेल्या संजय साडेगावकर यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

भाजपला धक्क्यावर धक्के

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (Shivsena) भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता.

कालिदास कोळंबकरांचे समर्थक शिवबंधनात

त्यानंतर शिवसेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. (Parbhani BJP Leader Sanjay Sadegaonkar Joins Shiv Sena)

भाजपात मोठया प्रमाणात आऊटगोईंग

कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजपा मुंबई मनपा जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात आऊटगोईंग सुरु झालं आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.

माजी आमदार हेमेंद्र मेहता शिवसेनेत

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या:

मुंबईतील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला धक्का; कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

(Parbhani BJP Leader Sanjay Sadegaonkar Joins Shiv Sena)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.