AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ ‘सहयोग’ करणार? पार्थ पवार श्रीनिवास पवारांच्या घरी, स्नेहभोजनावेळी काका-काकी समजूत काढण्याची चिन्हं

श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, अजितदादांच्या आई आशाताई पवार आणि श्रीनिवास यांची पत्नी शर्मिला पवार उपस्थित होते

पार्थ 'सहयोग' करणार? पार्थ पवार श्रीनिवास पवारांच्या घरी, स्नेहभोजनावेळी काका-काकी समजूत काढण्याची चिन्हं
| Updated on: Aug 15, 2020 | 4:04 PM
Share

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे कुटुंबात निर्माण झालेले तणावाचे वातावरण स्वातंत्र्यदिनी निवळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी पार्थ यांची समजूत काढली जाण्याची चिन्हं आहेत. (Parth Pawar Ajit Pawar gathers at brother Shrinivas Pawar Kanheri Residence)

कण्हेरीतील सहयोग सोसायटीत श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ दुपारी साडेतीन वाजता दाखल झाले. अजितदादांच्या आई आशाताई पवार, पत्नी सुनेत्रा पवार, बंधू श्रीनिवास पवार आणि भावजय शर्मिला पवार उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी कालही जाऊबाई शर्मिला पवार यांची भेट घेतली होती.

स्नेहभोजनाच्या वेळी काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार पार्थ यांना समजुतीच्या चार गोष्टी सांगण्याची शक्यता आहे. आमची कौटुंबिक भेट असल्याचे सांगत पार्थ पवारांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

पवार कुटुंबातील आजोबा आणि नातवामधील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार आणि आत्या सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नानंतर आता संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जाते. पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी पार्थ चर्चा करण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि पार्थ पवार वाद

शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर इमॅच्युअर म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.

अजित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांवर नाराज?

शरद पवार यांनी पार्थ पवारांचे कान जाहीररित्या टोचल्यानंतर अजित पवार आणि पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते वारंवार हे सांगत आहेत की, पवार कुटुंबात कुठलाही वाद नाही.

सुप्रिया सुळे यांची मध्यस्थी

पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना 13 ऑगस्टच्या सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’मधील पवारांच्या निवासस्थानी बोलावलं होतं. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली होती. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. (Parth Pawar Ajit Pawar gathers at brother Shrinivas Pawar Kanheri Residence)

त्यापूर्वी बुधवारी (12 ऑगस्ट) ‘सिल्व्हर ओक’ मधील बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर गुरुवारीही सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.

संबंधित बातम्या : 

पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो संयमी, सर्वांचा सन्मान करतो, आत्याकडून कौतुक

पार्थचा विषय कौटुंबिक, शरद पवार-पार्थ पवार वादावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना

(Parth Pawar Ajit Pawar gathers at brother Shrinivas Pawar Kanheri Residence)

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....