पार्थचा विषय कौटुंबिक, शरद पवार-पार्थ पवार वादावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले (Rohit Pawar first Comment On Parth Pawar) होते.

पार्थचा विषय कौटुंबिक, शरद पवार-पार्थ पवार वादावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 14, 2020 | 7:06 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर  केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे. याप्रकरणी शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.  (Rohit Pawar first Comment On Parth Pawar)

“पार्थ पवारांचा विषय हा कौटुंबिक आहे. त्याबाबत शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे. कौटुंबिक विषयावर राजकारण होतं आहे,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

सुशांत प्रकरणावरुन राजकारण होऊ नये 

“बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह प्रकरणी राजकारण होत आहे. हे मी सातत्याने सांगत होतो. ते आता दिसू लागले आहे. याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत,” असे रोहित पवार म्हणाले.

“महाराष्ट्रातील भाजपच्या एका खूप मोठ्या नेत्याला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, अशी बातमी समोर आली आहे. यावरुन भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागलं आहे. याला बिहार निवडणुकीचं कनेक्शन आहे. यावरुन राजकारण होऊ नये,” असेही रोहित पवारांनी सांगितले.

पवारांची कौटुंबिक बैठक

शरद पवारांच्या वक्तव्याबाबत पार्थ पवारांची नाराजी अद्याप कायम आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार उद्या (15 ऑगस्ट) ध्वजारोहणानंतर पार्थ पवारांसोबत बारामतीला जाणार आहेत. त्या ठिकाणी पवार कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या घरी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. इथे पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि पार्थ पवार वाद

शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर इमॅच्युअर म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.

अजित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांवर नाराज?

शरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि पार्थ पवार त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते वारंवार हे सांगत आहेत की, पवार कुटुंबात कुठलाही वाद नाही.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती. (Rohit Pawar first Comment On Parth Pawar)

संबंधित बातम्या : 

Pawar Family | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार, श्रीनिवास पवारांच्या घरी कौटुंबिक बैठक

शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, पार्थबाबत मी काय बोलणार? : संजय राऊत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.