Pawar Family | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार, श्रीनिवास पवारांच्या घरी कौटुंबिक बैठक

श्रीनिवास पवार यांच्या घरी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. इथे पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Pawar Family | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार, श्रीनिवास पवारांच्या घरी कौटुंबिक बैठक

पुणे : पवार कुटुंबातील आजोबा आणि नातवामधील वाद मिटवण्यासाठी (Ajit Pawar And Parth Pawar) खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नानंतर आता संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुण्यासाठी रवाना झाले आहेत. तिथून उद्याचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर पार्थ पवार हे अजित पवारांसोबत बारामतीला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत पवार कुटुंब एकत्र येणार आहे (Ajit Pawar And Parth Pawar).

शरद पवारांच्या वक्तव्याबाबत पार्थ पवारांची नाराजी अद्याप कायम आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार उद्या (15 ऑगस्ट) ध्वजारोहणानंतर पार्थ पवारांसोबत बारामतीला जाणार आहेत. तिथे पवार कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या घरी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. इथे पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि पार्थ पवार वाद

शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर इमॅच्युअर म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.

अजित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांवर नाराज?

शरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि पार्थ पवार त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते वारंवार हे सांगत आहेत की, पवार कुटुंबात कुठलाही वाद नाही.

सुप्रिया सुळे यांची मध्यस्थी

पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना काल सायंकाळी (13 ऑगस्ट) सिल्वर ओकवर बोलावलं. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती (Ajit Pawar And Parth Pawar).

त्यापूर्वी बुधवारी (12 ऑगस्ट) सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.

Ajit Pawar And Parth Pawar

संबंधित बातम्या :

Pawar Family | पार्थ पवारांची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा, सव्वा दोन तास सिल्वर ओकवर बैठक

Pawar vs Pawar | वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *