आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ कधीही वागणार नाही : सुनेत्रा पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवारांसाठी आता संपूर्ण कुटुंब प्रचाराच्या रिंगणात उतरलंय. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनीही मुलाचा प्रचार केला. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही, असा विश्वास […]

आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ कधीही वागणार नाही : सुनेत्रा पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवारांसाठी आता संपूर्ण कुटुंब प्रचाराच्या रिंगणात उतरलंय. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनीही मुलाचा प्रचार केला. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही, असा विश्वास आई सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांनी आयोजित केलेल्या बैठकीत दापोडी येथे सुनेत्रा पवार बोलत होत्या. सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, “पार्थ हा शरद पवार अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू त्याला घरातून मिळालेलं आहे. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा येईल असं तो वागणार नाही.”

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करतील, अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या असं देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या. महिला, तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मोदी सरकारच्या काळात अनेक नवीन शब्द ऐकायला मिळाले. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी होती, त्यामुळे पार्थला उमेदवारी देण्यात आल्याचंही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? पाहा

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.