AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्रातली जनताच सांगेल बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण!’, अविनाश जाधव यांचं अंधारेंना प्रत्युत्तर

'सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची चादर बाजूला काढून महाराष्ट्रात फिरावं!' असं आव्हान अविनाश जाधव यांनी सुषमा अंधारे यांना दिलं आहे.

'महाराष्ट्रातली जनताच सांगेल बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण!', अविनाश जाधव यांचं अंधारेंना प्रत्युत्तर
| Updated on: May 09, 2023 | 11:25 PM
Share

निनाद करमकर, अंबरनाथ : बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा बनावटगिरीचा मुखवटा गळून पडला आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यावर केली होती. या टीकेला आता मनसे नेते अविनाश जाधव ( Avinash Jadhav ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची चादर बाजूला काढून महाराष्ट्रात फिरावं, महाराष्ट्रातली जनताच त्यांना सांगेल की बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण आहे, असं अविनाश जाधव म्हणाले.

कर्नाटक निवडणुकीत ( Karnatak Election 2023 ) भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करणारे ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं, मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नाराजीनंतर राज ठाकरे यांनी हे ट्विट हटवलं, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. तसंच बाळासाहेबांचे आम्हीच वारसदार असल्याचा बनावटगिरीचा मुखवटा गळून पडला आहे, अशी टीकाही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.

अंबरनाथमध्ये बोलत असताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे यांना फक्त बडबड करण्यासाठी ठेवलं असून त्या काय बोलतात, आजकाल महाराष्ट्रातली जनता त्यांना मनावर घेत नाही. जर त्यांना खरंच असं वाटत असेल की मुखवटा वगैरे आहे, तर एक दिवस यावं आणि साहेबांसमोर बसावं. त्यांना कळेल की खरा वारसदार कोण आहे. त्या जर नीट शिवसेना पक्षाची चादर बाजूला काढून महाराष्ट्रात गेल्या, तर महाराष्ट्रातली जनताच त्यांना पटवून देईल की बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण आहे, असं अविनाश जाधव म्हणाले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.