सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो गायब, गणपतीबरोबर फक्त राणे

आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेंच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपची सत्ता येताच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो गायब, गणपतीबरोबर फक्त राणे
नारायण राणे, नितेश राणे (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 8:28 PM

सिंधुदुर्ग : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे ती फक्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक, कारण राणे विरुद्ध शिवसेना (Narayan rane vs Shivsena) असा सामना जोरदार रंगला होता. अजित पवारांनीही कोकणात दाखल होत प्रचार केला, मात्र एवढं करूनही भाजपने निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांपासून सर्वांचा समाचार घेत, आता टार्गेट राज्यात सरकार आणणे हे आहे असे सांगितले. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेंच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपची सत्ता येताच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. अध्यक्ष दालनातील बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार (Sharad pawar) यांचे फोटो काढून टाकण्यात आले.

आता फक्त गणपतीसोबत राणेंचा फोटो

अध्यक्षांच्या खुर्चीमागील भिंतीवर गेल्या कित्येक दिवसांपासून गणपतीच्या फोटो बरोबर हे तीन फोटो होते, मात्र कालपासून हे फोटो या भिंतीवरून गायब झाल्याची चर्चा होती. आता फक्त गणपती आणि नारायण राणे असे दोनच फोटो आहेत. जिल्ह्यात आज दिवसभर या फोटोंचीच चर्चा रंगली होती.

आज्ञातवासानंतर नितेश राणे पहिल्यांदाच बँकेत

आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. नितेश राणे यांनी थेट जिल्हा बँकेत दाखल होत अध्यक्ष उपाध्यांचे अभिनंदन केले. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातला राणेंचा विजय चांगलाच चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या विजयात नितेश राणेंची भूमिका निर्णयक राहिली आहे. मात्र संतोष परब प्रकरणाचा ससेमिरा मागे लागल्यानंतर राणे कुठेच दिसले नाही. भाजपचा विजय झाला तरी तो विजय साजरा करण्यासाठीही नितेश राणे नव्हते, त्यानंतर आज ते थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाल्याचे दिसून आले. सत्र न्यायलयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळत राणेंना झटका दिला आहे, त्यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टत हे प्रकरण पोहोचले आहे, राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तोही विषय चर्चेत आहे.

मुश्रीफांना का नकोय नगरचे पालकमंत्रिपद? म्हणतात जबाबदारीतून मुक्त करा…

मिलिंद नार्वेकरांनी अशी काय खेळी केली की, दरेकर, लाड चित झाले, मुंबै बँक सेना-राष्ट्रवादीची झाली?

Breaking : मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व, प्रसाद लाड पराभूत; अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.