PCMC Election 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विजयासाठी राष्ट्रवादी जीवाचं रान करणार; प्रभाग क्र. 25 मध्ये लढाई रंगणार…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची ज्या प्रमाणे जोरदार चर्चा असते त्याच प्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच आरक्षणांची जोरदार चर्चा होत असते. कारण आगामी निवडणुकीत कोणता प्रभाग आरक्षित झाला आहे आणि कोणता प्रभाग पारंपरिक राहिला आहे

PCMC Election 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विजयासाठी राष्ट्रवादी जीवाचं रान करणार; प्रभाग क्र. 25 मध्ये लढाई रंगणार...
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 6:13 AM

पुणेः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आपल्याच पक्षाची सत्ता असावी असं राजकीय पक्षांना वाटत असलं तरी पुण्यातील या महानगरपालिकेवर आता सत्तास्थापन करण्याची सोपी गोष्ट राहिली नाही. आगामी निवडणुकीत राज्यातील सत्तासंघर्षाचा परिणाम मुंबई महानगरपालिकेवर ज्या प्रकारे दिसणार आहे, त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरही दिसणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा बालेकिल्ला असला तरी आता भाजप, शिंदे गट शिवसेना, काँग्रेस, शिवसेना आणि इतर पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे सर्वच बाबींमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्र. 25 (Ward 25) चर्चेचा विषय ठरणार आहे. पुणे हे राष्ट्रवादी पक्षाचा (Nationalist Congress) बालेकिल्ला असला तरी यंदाच्या कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षासह इतर पक्षांना राजकीय लढाई केल्याशिवाय कोणताही विजय त्यांना मिळवता येणार नाही. बदलेल्या राजकीय नाट्याचा परिणाम महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आता मनपाच्या राजकारणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष नाट्याचा परिणाम याही महानगरपालिकेवर दिसण्याची शक्यता असून राष्ट्रवादी यासाठी आता काय रणनिती आखणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे पिंपरी महानगरपालिकेकडे राज्यातील अनेक पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवा
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
भाजप
मनसे
अपक्ष

आरक्षणावर ठरणार मनपाचा निकाल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची ज्या प्रमाणे जोरदार चर्चा असते त्याच प्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच आरक्षणांची जोरदार चर्चा होत असते. कारण आगामी निवडणुकीत कोणता प्रभाग आरक्षित झाला आहे आणि कोणता प्रभाग पारंपरिक राहिला आहे हे राजकीय नेत्यांसह राजकीय पक्षांनाही महत्वाचे असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना राजकीय धक्के बसले आहेत. कारण प्रभाग क्र. 25 मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण गटासाठी प्रभाग जाहीर झाला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्या जागेसाठी जोरदार चुरस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
भाजप
मनसे
अपक्ष

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, डी. वाय. पाटील कॉलेज, शिंदे वस्ती हा परिसर येतो. उत्तर परिसरामध्ये रेल्वे लाईन आहे, तर पूर्व भागात अश्विनी हॉस्पिटल लगतच्या रेल्वे लाईनपासून दक्षिणेस ओम चौक, बिजलीनगर, ओम चौकातून पश्चिमेस आकुर्डी चिखली स्पाईन रस्त्याच्या जनरल बिपिन रावत पुलापर्यंत व तिथून दक्षिणेस वाल्हेकरवाडी रस्त्यापर्यंत व रस्ता ओलांडून नाल्याने हॉटेल वाघिरे, रानमाळापर्यंत व त्या लगतच्या रस्त्याने दक्षिणेस पंपिंग स्टेशन ओलांडून पवना नदीपर्यंत हा परिसर आहे. दक्षिण बाजूला पवना नदी आहे तर पश्चिम बाजूला रावेत बास्केट ब्रिज पवना नदीपासून उत्तरेस औंध रावेत बी. आर. टी. रस्ता ओलांडून पाईप लाईन रोडने राजलक्ष्मी ग्रीन्स जवळील नाल्याच्या रेल्वे लाईन पर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
मनसे
भाजप
अपक्ष
Non Stop LIVE Update
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.