एक्झिट पोल अनाकलनीय, स्ट्राँग रुमच्या बाहेर जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात

अंदाज दाखवून ईव्हीएमच्या (Exit Polls Balasaheb Thorat) माध्यमातून विजयी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एक्झिट पोल अनाकलनीय, स्ट्राँग रुमच्या बाहेर जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात

शिर्डी : मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Exit Polls Balasaheb Thorat) यांनी निवडणूक आयोगाकडे केली. जनतेच्या मनात कायम संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याने ही मागणी केल्याचं थोरात यांनी सांगितलं. सर्व्हेतून दिले जाणारे अंदाज कल्पनेच्या पलीकडचे आहेत, मात्र खरी वस्तूस्थिती वेगळी आहे. अंदाज दाखवून ईव्हीएमच्या (Exit Polls Balasaheb Thorat) माध्यमातून विजयी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे.

टीव्ही 9- सिसेरो यांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 123, तर शिवसेनेला 74 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे या एक्झिट पोलनुसार ‘अब की बार 200 पार’ चा नारा पार करण्यातही महायुती काही पावलं मागे राहण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस 40 आणि राष्ट्रवादी 35 जागा मिळवत शिवसेनेने एकट्याने मिळवलेल्या जागांची बरोबरी करेल, असा अंदाज आहे.

टीव्ही 9 सिसेरो एक्झिट पोलचा अंदाज 2019

भाजप – 123
शिवसेना – 74
काँग्रेस – 40
राष्ट्रवादी – 35
मनसे – 00
इतर – 16

महाआघाडी आणि महायुतीला किती जागा?

महायुती – 197
महाआघाडी – 75
इतर – 16
एकूण – 288

जागांचा हा अंदाज दुपारपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरुन वर्तवण्यात आला आहे. अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल होईल. हा अंदाज आहे, अंतिम निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होईल.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI