नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान मोदी नाराज?

नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान मोदी नाराज?


अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये भाजपच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वतः उपस्थित राहणार आहेत. यावेळी येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना हरवण्यासाठी रणनीती आखण्यात येईल. शिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. त्यामुळे गांधींची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं जातंय.

दिलीप कुमार मनसुखलाल गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पंतप्रधान त्यांच्यावर नाराज होण्याचं कारणही तसंच आहे. आपल्याला मंत्रीपद द्यावं या मागणीसाठी गांधी यांनी एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवल्याचं बोललं जातंय. जैन खासदार असल्याने मंत्रीपद द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. आधी पक्षाचं काम करा, नंतर मंत्रीपदाचं पाहू असं मोदींनी शिष्टमंडळाला बजावल्याची माहिती आहे. यामुळेच मोदी खासदार गांधींवर नाराज आहेत.

मोदींचं महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांवर विशेष लक्ष

विरोधक मोदींना हरवण्यासाठी एकत्र येत आहेत. तर मोदीही आपला प्लॅन तयार करत आहेत. या प्लॅनमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे अर्धे खासदार अडचणीत सापडताना दिसत आहेत. कारण, खासदारांचा कामाचा अहवाल मोदींनी मागवलाय. संसदीय पटल कार्यालयाने 22 खासदारांची माहिती मागवली आहे. संसदेतील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांचा अहवाल, संसदीय बैठकीतली उपस्थिती याचा यामध्ये समावेश आहे. वाचापंकजांसमोर खासदार दिलीप गांधींना मुंडे समर्थकांचे खडेबोल

22 खासदारांचा अहवाल तयार करुन तो मोदींसमोर सादर केला जाईल. कोणत्या खासदारांना परत तिकीट मिळेल, कोणाचा पत्ता कट होईल हे ठरवलं जाणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना सध्या स्वतंत्र लढण्याची भाषा करते. पण सध्या तरी जे 22 खासदार आहेत, त्यांचं काम आणि लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आता मोदीच पुढे सरसावले आहेत. वाचाकिंगमेकर शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुलींचा निकाल लागला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही हालचालींना वेग आलाय. दोन दिवसांआधीच नागपुरात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. 2019 ची लढाई 2014 सारखी नाही. एकत्र येऊन मोदींना हरवण्याचा प्लॅन विरोधक करत आहेत. त्यामुळे तगड्या टीमसोबतच मैदानात उतरण्याची तयारी मोदींनी केली आहे. पण यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची धडकी भरली हे मात्र निश्चित आहे.

या खासदारांच्या तिकिटावर टांगती तलवार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI