शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

भाजपच्या (BJP) महाजनादेश यात्रेचा (Mahajanadesh Yatra) आज नाशिकमध्ये (Nashik) समारोप होत आहे.

, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

नाशिक : भाजपच्या (BJP) महाजनादेश यात्रेचा (Mahajanadesh Yatra) आज नाशिकमध्ये (Nashik) समारोप होत आहे. यानिमित्ताने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Nashik) यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मोदी नाशिकमध्ये दाखल झाले. ही सभा नाशिकमधील तपोवन परिसरात 20 एकरमध्ये झाली. सभेसाठी भव्य मंच उभारण्यात आला होता. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसराला छावणीचं स्वरुप आलं होतं.

Live Updates

, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

शरद पवारांची विधाने क्लेशदायक, त्यांना पाकिस्तान छान वाटतो : नरेंद्र मोदी

19/09/2019,2:58PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती भारतातच, या जॅकेट्सची निर्यातही सुरु : नरेंद्र मोदी

19/09/2019,2:45PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

19/09/2019,2:44PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

गुजरात महाराष्ट्राचा छोटा भाऊ: नरेंद्र मोदी

19/09/2019,2:32PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

वसंतरावांनंतर दीर्घ काळासाठी सरकार चालवणारे फडणवीस एकमेव मुख्यमंत्री : मोदी

19/09/2019,2:30PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

देवेंद्र फडणवीसांना नमन करुन मलाही महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वाद मिळाला : मोदी

19/09/2019,2:27PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

डोक्यावरील पगडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती जबाबदारीचा संकेत

19/09/2019,2:20PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

मोदींच्या भाषणाला सुरुवात

मोदींच्या भाषणाला सुरुवात, प्रभू श्रीराम, सीता, सप्तशृंगी मातेला प्रणाम करत मराठीतून सुरुवात

19/09/2019,2:15PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

उदयनराजे भोसले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पगडी घालून स्वागत

19/09/2019,1:59PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये सभास्थळी दाखल

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये सभास्थळी दाखल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

19/09/2019,1:38PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल

19/09/2019,1:17PM
, शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा : नरेंद्र मोदी

मोदींच्या सभेत कांदा आणण्यास मनाई

पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेत कांदा आणण्यास बंदी, शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने निर्णय, अनेक आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

19/09/2019,10:18AM

या सभेसाठी एकूण 4 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. मोदींच्या भाषणात कोणताही अडथळा नको म्हणून तब्बल 17 लाख रुपयांची साऊंड सिस्टीम लावण्यात आली आहेत. 20 एकराच्या अत्याधुनिक मंडपात लोकांना मोदींचं भाषण दिसावं यासाठी 4 लाख 86 हजार रुपयांचे एल.ई.डी लावण्यात आले. याशिवाय मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सभेच्या मंचापासून 50 मीटरवर व्हीव्हीआयपी व्यवस्था करण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यभर जनसंपर्क वाढवला. केंद्रातील स्पष्ट बहुमताप्रमाणेच राज्यातही भाजपला बहुमत मिळेल, असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक नेते महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. आता स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या संबोधित केले.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या यात्रेत फडणवीसांनी आपल्या सरकारच्या कामाचा प्रचार करत जनतेला पुन्हा निवडून देण्याचं आवाहनही केलं आहे. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी देखील जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तसेच अनेक ठिकाणी सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीबाबत अनेक चर्चांना उधाणही आले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *