उद्धव ठाकरेंनंतर सोलापूर जिल्ह्यात आता मोदींची सभा होणार!

सोलापूर : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच निवडणूक प्रचाराच्या कामाला लागल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भाजप खासदार अमर साबळे यांनी दिली. आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंढरपूर भेट आणि आता मोदींचा सोलापूर दौरा यामुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. …

उद्धव ठाकरेंनंतर सोलापूर जिल्ह्यात आता मोदींची सभा होणार!

सोलापूर : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच निवडणूक प्रचाराच्या कामाला लागल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भाजप खासदार अमर साबळे यांनी दिली. आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंढरपूर भेट आणि आता मोदींचा सोलापूर दौरा यामुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.

सोलापुरातील विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30 हजार घरकुलांचं हस्तांतरण, स्मार्ट सिटीच्या कामाचं उद्घाटन, 180 कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचे उद्घाटन, देहू-आळंदी पालखी मार्गाचे भूमीपूजन, तुळजापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचे भूमीपूजन अशा विविध कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. पंढरपूर येथे 24 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात घेण्यात आली. त्यामुळे सोलापूर जिल्हा चांगलाच राजकीय पटलावर आलाय. विविध विकासकामं आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावत असले तरी त्यामागे आगामी निवडणूक प्रचाराचा अजेंडा राहणार आहे. वाचादुष्काळ ते राफेल, उद्धव ठाकरेंची मोदींवर चौफेर टीका

विठुरायाच्या पंढरीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी संकेत दिले होते. शेतकरी प्रश्न, राफेल व्यवहार, राम मंदिर, या सर्व मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय जानेवारीमध्ये दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. आरक्षणप्रश्नी धनगर समाजासोबत शिवसेना खांद्याला खांदा लावून उभी असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानंतर भाजपनेही आता कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड केली आहे.

मोदी सध्या दररोज कोणत्या ना कोणत्या राज्यात विकासकामांचं उद्घाटन करत आहेत. अर्थात यामागे आगामी निवडणुकीचं गणित आहे. काही दिवसांपूर्वीच शिर्डीत मोदींचा कार्यक्रम झाला होता, जिथे घरांचं वाटप करण्यात आलं होतं. मोदींनी लाभार्थ्यांशी संवादही साधला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *