
नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होत आहे. 4 जून रोजी निवडणुक निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीच्या घोषणेनंतर देशात आचारसंहिता लागू झाली. यानंतर भाजप नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांनी आपापली निवडणूक रणनीती अधिक धारदार करण्यास सुरुवात केली. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने बेरोजगारी, महागाई, जात जनगणना तसेच संविधान वाचवण्याचे मुद्दे प्रचारातून समोर आणले. तर, एनडीएने मोदी सरकारच्या 10 वर्षातील विकासकामांची जंत्री जनतेसमोर ठेवली. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास गरीब महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेईल, असा आरोपही केला. याशिवाय या सर्व प्रचारात अनेक मुद्दे प्रबळ राहिले. 7 टप्प्यातील या निवडणुकीत प्रमुख घटना काय होत्या चला जाणून घेऊ… पहिला टप्पा : बिल गेट्स यांनी घेतली मुलाखत पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी...