AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीचा परदेशात अपघात, तातडीने मुंबईला आणलं, उपचार सुरू

भारतातील एका प्रसिद्ध उद्योगपतीचा परदेशात अपघात झाला असून त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीचा परदेशात अपघात, तातडीने मुंबईला आणलं, उपचार सुरू
SinghaniyaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 20, 2026 | 11:18 PM
Share

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया यांच्यासोबत मोठा अपघात झाला आहे. मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्यामुळे झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहे. या अपघातानंतर त्यांना एअर लिफ्ट करून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या सोबत बोटीत देशातील दिग्गज रॅली ड्रायव्हर हरी आणि आणखी एक मित्र होता, हे दोघे सध्या बेपत्ता आहेत. एएनआयच्या एक्सवरील पोस्टनुसार, सिंघानिया यांच्या प्रवक्त्याने सांगितले की अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते मुंबईत उपचार घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टेक्सटाइल उद्योगाला मोठी ओळख मिळवून दिली

गौतम सिंघानिया हे देशातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक आहेत. ते रेमंड लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त ते कार रेसिंग, एव्हिएशन आणि लक्झरी जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. 9 सप्टेंबर 1965 रोजी जन्मलेले सिंघानिया हे त्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीतले आहेत, ज्यांनी भारतातील टेक्सटाइल उद्योगाला मोठी ओळख मिळवून दिली आहे.

2000 मध्ये रेमंड ग्रुपची धुरा सांभाळली

गौतम सिंघानिया 1990 च्या दशकात कौटुंबिक व्यवसायात सक्रिय झाले. 2000 साली त्यांनी रेमंड ग्रुपची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कंपनीला पारंपरिक सूटिंग-शर्टिंग ब्रँडपासून जागतिक लाइफस्टाइल ब्रँडमध्ये रूपांतरित केले. ‘The Complete Man’ ही ब्रँड ओळख त्यांनीच दिली. टेक्सटाइलसोबतच रेडीमेड कपडे आणि रिटेल क्षेत्रातही कंपनीचा विस्तार झाला आहे.

गौतम सिंघानिया यांचे वैयक्तिक आयुष्य

गौतम यांचा विवाह नवाज मोदी सिंघानिया यांच्याशी झाला होता. अलीकडील काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, विशेषतः वाद आणि घटस्फोटाच्या चर्चेमुळे ते वारंवार प्रकाशझोपात राहिले. याशिवाय कौटुंबिक मालमत्ता, पत्नीबरोबरचे मतभेद आणि कंपनीतील अंतर्गत निर्णय यांमुळेही ते चर्चेत राहिले आहेत. आता त्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रॅली ड्रायव्हर हरी आणखी एक मित्र अपघातानंतर बेपत्ता आहेत. त्यांचा सध्या शोध सुरू आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?