मोदी-शाह शिवरायांच्या विचाराने कार्यरत : उदयनराजे

भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं.

मोदी-शाह शिवरायांच्या विचाराने कार्यरत : उदयनराजे
Follow us
| Updated on: Sep 14, 2019 | 11:45 AM

नवी दिल्ली : उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी आज (14 सप्टेंबर) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah), जे. पी. नड्डा (J P Nadda), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हेही उपस्थित होते. भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं. काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नाबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हतं. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे भोसले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो लोकशाही विचार होता. त्यांचं जसं अष्टमंडळ होतं, त्याचाच आधार घेऊन भारतात लोकशाही प्रक्रिया सुरू आहे. या लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात भाजप काम करत आहे.”

मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्य करत असल्याचंही उदयनराजेंनी यावेळी नमूद केलं. ते म्हणाले, “भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. प्रत्येक राज्यात भाजप वाढत आहे. अनेक लोक भाजपशी जोडले जाण्यास इच्छुक आहेत. त्यामागे हेच कारण आहे. लहानपणापासून काश्मीरचा विषय ऐकतो आहे. मात्र, कुणीही त्याकडं लक्ष दिलं नाही. मात्र मोदींनी संपूर्ण देश एक राहावा, भारत मजबूत व्हावा म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेतला. तो योग्य निर्णय आहे.”

‘पहिल्या 3 महिन्यात राजीनामा देणारा मी पहिला खासदार’

उदयनराजे यांनी खासदारीच्या राजीनाम्याचा निर्णय, भाजप प्रवेश आणि माध्यमांमध्ये होत असलेली टीका यावरही भाष्य केलं. उदयनराजे म्हणाले, “माध्यमं टीका करत असतात. त्यांचे वेगळे विचार असू शकतात. मात्र, देशभरात लोक भाजपमध्ये येत आहेत. त्यामागे एक विचार आहे. म्हणूनच मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी सुरुवातीच्या 3 महिन्यातच खासदाकीचा राजीनामा दिला. देशात पहिल्यांदा असं पाऊल उचललं असावं. शेवटी शेवटी कुणीही राजीनामा देतं.”

उदयनराजे यांनी फडणवीसांच्या कामांच कौतुक करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाईट वागणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी बोलायचं म्हणून बोलत नाही. कुणाला चांगलं वाटावं म्हणूनही बोलत नाही. देवेंद्र फडणवीस आणि माझी 1998 पासून मैत्री आहे. महाराष्ट्रात त्यांनी चांगलं काम केलं. मी भाजपचं राजकारण पाहिलं नाही. माझ्या मतदारसंघात मागील 15 वर्षात हाताला घट्टे पडले. आम्ही आधी फाईल दिली तर आवक-जावकला न जाता थेट कचराकुंडीत जायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्याची धुरा सांभाळल्यानंतर साताऱ्यात अनेक कामं केली. त्यांनी सर्व मुख्य कामं मार्गी लावली.”

‘जी कामं सत्तेत राहून झाली नाही, ती विरोधीपक्षात असताना झाली’

आत्मचिंतन केलं असतं तर आत्मक्लेषाची वेळ आली नसती, असं म्हणत उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, “कुणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल, तर वाईट बोलायचं नाही हा माझ्या घराण्याचा नियम. त्यामुळे मी कुणाविषयीही काहीही बोलणार नाही. सत्तेत असूनही संघर्ष करावा लागतो. विरोधीपक्षात असतानाही आत्ता माझी जी कामं झाली ती सत्तेत होतो तेव्हाही झाली नव्हती. म्हणूनच मतदारसंघातील मतदारांचा विचार घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

ईव्हीएमवरील आक्षेपांवर उदयनराजंची भूमिका

उपस्थित पत्रकारांनी उदयनराजेंना त्यांच्या जुन्या आक्षेपांचीही आठवण करुन दिली. त्यावर उदयनराजे म्हणाले, “अनेक ठिकाणी वेगळे निकाल लागले. लोकांनी देखील इतके एकतर्फी निकाल लागू शकत नाही असं म्हणत तक्रार केली. म्हणून मलाही तसं वाटलं. शरद पवार, ममता बॅनर्जी अशा ज्येष्ठ नेत्यांनाही तसं वाटलं. पण मोदींची कामं पाहून लोकांनी काम करणाऱ्यांना मतं दिली आहेत.”

याआधी मुख्य नेत्यांच्या मतदारसंघांमध्येच कामं झाली. इतर आमदार-खासदारांच्या मतदारसंघात कामं झाली नाही, असाही आरोप उदयनराजेंनी केला.

शरद पवारांना का भेटले?

उदयनराजेंनी भाजप प्रवेशाच्या आधी शरद पवारांचीही भेट घेतली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले, “मी जे करतो ते सांगून करतो. मी माझा भाजप प्रवेशाचा निर्णय सांगण्यासाठीच शरद पवारांना भेटलो. माझ्यासोबत आडवा आणि जिरवा असं राजकारण झालं. मागील लोकसभा निवडणुकीत माझा विजय झाला असला तरी अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतं. त्यामुळे नैतिक पातळीवर मी तो माझा पराभवच मानला आणि अंगाला गुलाल लावला नाही.”

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.