बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका

बिहार विधानसभा निवडणुकीच्पया हिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मोदी यांनी RJD आणि कांग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही आज बिहारमध्ये दोन सभा होणार आहेत.

बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 12:01 PM

रोहतास: बिहारमध्ये भाजप, JDU आणि मित्र पक्षांच्या NDAचंच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. अनेक सर्वेक्षणात एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झाल्याचं मोदी म्हणालेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. आज पंतप्रधान मोदी यांची बिहारमधील पहिली सभा रोहतास जिल्ह्यातील डेहरी ऑन सोन इथं पार पडली. (PM Narendra Modi in Bihar election campaign)

पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील जनतेला संबोधित करताना RJD आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बिहारमधील लालटेनचा जमाना गेला. आज बिहारमध्ये रस्ते, वीज, सर्वकाही आहे. बिहारमधील लोक न घाबरता बिहारमध्ये राहात आहेत. ज्यांचा इतिहास बिहारला बिमारु बनवण्याचा आहे, त्यांना जवळपासही फिरु न देण्याचं आता बिहारच्या जनतेनं ठरवलं आहे’. अशा शब्दात मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या RJDवर शरसंधान साधलं.

रामविलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात दिवंगत रामविलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. बिहारने नुकतेच आपल्या अशा दोन सुपुत्रांना गमावले, ज्यांनी इथल्या लोकांची अनेक वर्षे सेवा केली. माझे जवळचे मित्र, गरीब, दलितांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहणाऱ्या रामविलास पासवान यांना श्रद्धांजली अपर्ण करतो, अशा शब्दात मोदी यांनी पासवान यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच गरीबांच्या विकासासाठी निरंतर काम करणाऱ्या रघुवंश प्रसाद सिंह यांनाही पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान मोदी – राहुल गांधी आज आमने-सामने

बिहारमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दोन रॅली होणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत JDUचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार असतील तर राहुल गांधी यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री आणि RJD नेते तेजस्वी यादव असणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आज बिहारमध्ये तीन सभा होणार आहेत. रोहतास जिल्ह्यातील डेहरी ऑन सोन, गया आणि भागलपूर इथं पंतप्रधान मोदी यांची रॅली आणि सभा होणार आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज दोन रॅली होणार आहेत. नवादा जिल्ह्यातील हिसुआ आणि भागलपूर जिल्ह्यातील कहलगांव इथं राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. यावेळी RJD नेते तेजस्वी यादव हे राहुल यांच्यासोबत हिसुआतील रॅली आणि सभेत सहभागी होणार आहेत.

संबंधित बातम्या:

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, रॅली आणि सभांचा धडाका

सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

PM Narendra Modi in Bihar election campaign

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.