AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; पत्नी मंदाकिनी यांच्यासह 11 जणांविरुद्ध पोलिसात तक्रार

बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याचा आरोप करत प्रशासक मंडळाने आक्षेप घेतला आहे. गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी थेट पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह(Mandakini Khadase) इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली आहे.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; पत्नी मंदाकिनी यांच्यासह 11 जणांविरुद्ध पोलिसात तक्रार
| Updated on: Aug 02, 2022 | 10:34 PM
Share

जळगाव : जळगाव(Jalgon) जिल्हा दूध संघाचं राजकारण चांगलच तापलं आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या(Eknath Khadse) अडचणीत वाढ झाली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याचा आरोप करत प्रशासक मंडळाने आक्षेप घेतला आहे. गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी थेट पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह(Mandakini Khadase) इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली आहे. यामुळे दूध संघाचा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचल्याचे दिसत आहे.

जळगाव जिल्हा दुध संघातील (Jalgaon District Dudh Sangh) कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या (Fraud Case) चौकशीसाठी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत करण्यात येणार आहे. राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी चौकशी समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 20 ऑगस्ट पर्यंत चौकशी करून तो अहवाल राज्य शासनाला देण्याचे आदेश दिले गेले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Shinde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल झालाय.

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

दूध संघात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी नागराज जनार्दन पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे जर्नादन पाटील यांच्या यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आल्याचेही सांगम्यात आले आहेत.

नागराज पाटील यांचे आरोप

दूध संघाच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नागराज पाटील यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. नागराज पाटील यांनी दूध संघावर गंभीर आरोप केले होते.

कागदपत्र जाळल्याचाही आरोप

यामध्ये दूध संघाची जुनी कागदपत्रे जाळण्यात आली होती, असाही आरोप करण्यात आला होता. नागराज पाटील यांच्या या आरोपामुळे मात्र राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

अडचणीत होणार वाढ

मागील 2020 मध्येही जळगाव दूध संघावर गंभीर आरोप करुन कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी 3 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे शासनाने आता चौकशी समिती गठीत केली असल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे वर्तवली जात आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.