मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल पण, पोलीस यंत्रणा… धनंजय मुंडे यांचा थेट वर्मावरच घाव; नेमकं काय म्हणाले?

Munde vs Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. तसेच पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल पण, पोलीस यंत्रणा... धनंजय मुंडे यांचा थेट वर्मावरच घाव; नेमकं काय म्हणाले?
Fadnavis and Munde
| Updated on: Nov 07, 2025 | 3:55 PM

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. तसेच पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंडेंना संपवून टाकेन म्हणतात…

धनंजय मुंडेंनी आपल्या पत्रकार परिषदेत, ‘मुंडेंना संपवून टाकेन म्हणतात. मला संपवून टाकेल असं ऑन ए्अर म्हणत असतील तर काय कारवाई होईल. सरकार काय करणार आता. कायदा नाही का. माझं जीवन आणि मरण हे गरीबातीली गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आहे. दादागिरी सुरू आहे. अंतरवलीतूनच अंतर पडत चाललं आहे. तुमच्या मेव्हण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले. मी सरकारला विचारणार आहे. त्यात काय कारवाई झाली? असा सवाल उपस्थित केला आहे.

इथली पोलीस यंत्रणा…

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, जरांगेजी असं करू नका. धन्याचं बी ठेवायचं नाही. ही धमकी नाही? धनंजय मुंडेंचं बी सुद्धा ठेवायचं नाही. ही धमकी कुणी दिली? वंजारी जातीचं बी सुद्धा ठेवायचं नाही. ओबीसींचं सर्व बीला बी ठेवायचं नाही ही धमकी कुणी दिली? सरकार त्यांचंच ऐकत असेल तर अख्ख्या ओबीसींनी गोळ्या घाला आणि संपवून टाका आम्हाला. सर्व यंत्रणा तुमच्या म्हणण्याने चालत असतील तर संपवा आम्हाला. फक्त तुम्हीच राहा. मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल. पण इथली पोलीस यंत्रणा कोणत्याही जाती धर्माचे असो यांना घाबरून आहे. म्हणूनच कर्ते करवते तेच आहेत.

सर्वांचाच टार्गेट धनंजय मुंडे का?

धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, ‘सर्वांचाच टार्गेट धनंजय मुंडे का? एवढ्या जणांना मी आवरला जात नाही का? कमाल आहे. त्या दिवशीच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला त्याचा राग आला की मी चष्मा पाठवला नाही याचा राग आला. माझ्यापासून संमद्या पृथ्वीतलाला धोका आहे असं समजा. मी काय कोव्हिड व्हायरल झालो काय आता. एका मंत्र्याला माझ्यासापासून धोका. ऑन एअर ते संवैधानिक पदावरील मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत ऑन एअर कुणाचीही आयमाय काढतात. सरकार काही करत नाहीत. आम्ही काय एवढे खुळे नाहीत. या सर्व गोष्टी न समजायला.’