AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : माझ्याकडून त्यांना धोका?…. माझं काय त्यांच्या… धनंजय मुंडेंनी जरांगेंच्या त्या आरोपाचा घेतला समाचार

माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा आरोप करणाऱ्या मनोंज जरांगेंवर धनंजय मुंडे चांगलेच संतापले. त्यांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंच्या सर्व आरोपांवर स्पष्ट उत्तर देत ते फेटाळून लावले. जरांगेंवर त्यांनी तिखट शब्दांत निशाणा साधला.

Dhananjay Munde : माझ्याकडून त्यांना धोका?.... माझं काय त्यांच्या... धनंजय मुंडेंनी जरांगेंच्या त्या आरोपाचा घेतला समाचार
धनंजय मुंडे यांचा जरांगेंवर निशाणा
| Updated on: Nov 07, 2025 | 3:15 PM
Share

मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्यांनी खळबळ उडाली. त्यानंतर आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उडवून दिली. माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केल्याने सर्वांनाच धक्का बसला. मात्र आता या आरोपानंतर खुद्द धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी जरांगेंच्या सर्व आरोपांची स्पष्टपणे उत्तर देत माझ आणि जरांगे यांचं काही वैर नसल्याचं म्हटलं. मी मुंबईतील मराठा आंदोलनात सामील झालो होतो. माझं जरांगेंशी काही वाकडं नाही, माझ्याकडून त्यांना कसला धोका आहे ? असा सवाल त्यांन विचारला. माझा काय त्यांच्या बांधाला बांध आहे का असं विचारत संतापलेल्या मुंडे यांनी जरांगे यांना सडेतोड उत्तर दिली. एवढंच नव्हे तर जरांगे यांना या सर्व गोष्टी महागात पडतील, कर्मा रिपीट्स असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.

धनजंय मुंडे यांचा जरांगेंवर निशाणा

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, जरांगेनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं. कधी आहे तुमची तयारी?,. ईडब्ल्यूएसमध्ये जास्त आरक्षण मिळतं की ओबीसीत मिळतं?. तारीख तुम्ही सांगा. जागा तुम्ही सांगा. महाराष्ट्र बघेल. दाखवून देऊ ईडब्ल्यूएसमध्ये जास्त मिळतं की ओबीसीत मिळतं, असं मुंडे म्हणाले.

तुम्ही हाकेंना मारलं. मारामारीची प्रवृती कुणाची. तुम्ही वाघमारेंना मारलं. किती उदाहरणं देऊ. तुम्ही अनेकांना मारलं. मला धोका… माझ्याकडून त्यांना धोका. माझा त्यांचा काय बांधाला बांध आहे?. माझं अन् त्यांचं वैर काय? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. आमचं वैर एवढंच की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावू असंही ते म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर काही तरी नावं घेतात. मी दर सोमवारी गेस्ट हाऊसला बसतो. अनेक लोक येऊन भेटतात. अटक केलेल्यांपैकी कुणी भेटलं असेल, बाजूला जाऊन बोललं असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे. भेटल्याने आणि बाजूला बोलल्याने मला कळत नाही यात कसला कट रचला जातो. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचे. बोलणारे कार्यकर्ते त्यांचे, कबुली जबाब देणारे त्यांचेच. आरोप मात्र माझ्यावर करत आहेत. माझ्या जीवनात कंपलीटली मर्डरर म्हणून माझी ईमेज केली जात आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला.

माझी ब्रेन मॅपिंग करा…

याला कारण एकच आहे. मी दोन प्रश्न विचारले. त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलण्याची त्यांची तयारी नाही. या प्रकरणात पोलिसांनी… जरांगेंना धमकी आहे. त्यांना मी काही करतो असं वाटत असेल तर माझी मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने नाही तर सीबीआयने केली पाहिजे. माझ्या मनात कुणाला मारायचं पाप आलं असेल. कुणाला थापड मारायची तर माझी ब्रेन मॅपिंग करा. जरांगेचीही करा. आरोपींची करा. नार्को टेस्ट करा. अडचण येत असेल तर मी कोर्टाची परवानगी घेऊन माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंक आणि नार्को टेस्ट करण्याची परवानगी घेतो अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी स्पष्ट उत्तर देत जरांगेंचे सर्व आरोप परतवून लावले.

कर्मा रिपीट्स, हे महागात पडेल…

म्हणे माझं फोनवर बोलणं झालं. चोवीस तास सुरू असतो. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्या गरीबांना अडचण आली तर ते माझा फोन लावतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी फोन सुरू ठेवतो. त्यात मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो का. त्यांना संपवण्यासाठी बोललो का. या सर्व गोष्टी जरांगे जी महागात पडणार आहे. कर्मा रिपीट. तुम्ही जेवढं खोटं कराल. तेवढं ते मागे फिरेल असा इशाराही धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना दिला.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.