पुण्यातील पर्वती मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक, पुण्यातील भाजपचं वजनदार महिला नेतृत्व, माधुरी मिसाळ यांचा राजकीय प्रवास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेलं व्यक्तीमत्व, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात नाव असलेले सतिश धोंडिबा मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ या पत्नी आहेत. त्याचबरोबर माधुरी मिसाळ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या केशवराव देशपांडे यांची नात आहेत. अशा माधुरी मिसाळ यांच्या राजकीय क्षेत्राचा आढावा आपण घेत आहोत.

पुण्यातील पर्वती मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक, पुण्यातील भाजपचं वजनदार महिला नेतृत्व, माधुरी मिसाळ यांचा राजकीय प्रवास
भाजप आमदार माधुरी मिसाळ

सागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पुण्यातील पर्वती या भागातून 10 वर्षे नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केलीय. पुणे भाजपमधील एक वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेलं व्यक्तीमत्व, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात नाव असलेले सतिश धोंडिबा मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ या पत्नी आहेत. त्याचबरोबर माधुरी मिसाळ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या केशवराव देशपांडे यांची नात आहेत. अशा माधुरी मिसाळ यांच्या राजकीय क्षेत्राचा आढावा आपण घेत आहोत. (Political journey of BJP MLA Madhuri Misal, hat trick of victory from Parvati constituency)

माधुरी मिसाळ यांनी कॉमर्समधून पदवी मिळवली आहे. त्यांनी 2007 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर 2009 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिल्या आमदार म्हणून निवडून आल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं वारं होतं. त्यावेळी माधुरी मिसाळ यांनी राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं होतं. त्या 70 हजारापेक्षा अधिक विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या. 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी पवर्ती मतदारसंघातून तब्बल 22 नगरसेवक निवडून आणले आहेत. 2019मध्ये माधुरी मिसाळ या सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

माधुरी मिसाळ यांनी पेललेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या

माधुरी मिसाळ यांच्यावर भाजपच्या विधानसभा प्रतोदपदाची जबाबदारी आहे. त्यातबरोबर सार्वजनिक उपक्रमक समिती, महिला व बालकल्याण समिती, लोकलेखा समितीवरही त्या सदस्या आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यावर 2019 मध्ये भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. 2020 मध्ये त्यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. तसंच विद्या सहकारी बँकेच्या त्या माजी अध्यक्षा राहिल्या आहेत. तर उद्यम नागरी सहकारी बँकेच्या त्या संचालक आहेत. तर सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.

सेवा, संघटन आणि संसदीय कामकाज या त्रिसूत्रीच्या सहाय्यानं पंधरा वर्षात त्यांनी पर्वती मतदारसंघात काम केलं आहे. समाजाची नेमकी गरज लक्षात घेऊन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत.

माधुरी मिसाळ यांची कारकिर्दीतील महत्वाची कामे

>> पुणे मेट्रोला मान्यता

>> स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी विशेष प्रयत्न

>> स्वारगेट चौकात ट्रान्सपोर्ट हब

>> स्वारगेट चौकातील उड्डाणपूल पूर्ण

>> सिंहगड रस्ता उड्डाणपूल मान्यता

>> स्वारगेट-कात्रज बीआरटी सक्षमीकरण

>> बिबवेवाडीत अण्णा भाऊ साठे नाट्यगृह

>> ससूनच्या धर्तीवर बिबवेवाडीत ५०० खाटांचे रुग्णालय

>> पंधराशे ससार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती

>> पर्वती पर्यटनासाठी १२ कोटी रुपये

>> मार्केट यार्ड परिसराचा सुनियोजितविकास

>> पु. ल. देशपांडे उद्यान निर्मिती फेज २

>> पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे काम सुरू

>> सिंहगड रस्त्यावर पोलीस स्टेशन

>> गंगाधाम चौकात अग्निशमन केंद्र

>> स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालयाचे काम पूर्ण

>>पाचगाव पर्वतीसाठी वन विकास आराखडा मंजूर

इतर बातम्या :

टिळक घराण्याचा वारसा तरीही राजकारणाची सुरुवात पालिका निवडणुकीतून; मुक्ता टिळकांची अशी आहे राजकीय कारकिर्द!

9 वेळा जिंकणाऱ्या खासदाराला हरवलं, पहिल्याच टर्ममध्ये संसदेत छाप, कोण आहेत हीना गावित?

Political journey of BJP MLA Madhuri Misal, hat trick of victory from Parvati constituency

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI