
४८ वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला. आता १० फेब्रुवारी रोजी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहे. त्यांचे आणि बॉलीवूडचे संबंध कसे तयार झाले? सलमान आणि शाहरुख खानचे काय? बॉलीवूडमधील प्रत्येकजण बाबा सिद्दीकी यांच्या पार्टीत येतात.

बाबा सिद्दीकी बॉलिवूडमध्ये कसे आले? वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांचे वडील घड्याळे बनवत होते. त्यावेळी ते ही वडिलांना मदत करू लागले. वांद्रे येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. याच ठिकाणी अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींचीही घरे आहेत.

बाबा सिद्दीकी राजकारणात आपला ठसा उमटवत होते. त्यावेळी त्यांची भेट संजू बाबा म्हणजे संजय दत्त यांच्यांशी झाली. दोघांमधील मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्याचा फायदा सिद्दीकीला झाला. मग संजय दत्त याने बाबाने सिद्दीकीची ओळख त्याचा जवळचा मित्र सलमान खानशीही करून दिली.

कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात वाद झाला होता. या भांडणानंतर बराच वेळ त्यांचा संवाद थांबला होता. मग 2013 मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सलमान शाहरुख खान आले होते. यावेळी बाबा सिद्दीकी यांनी त्यांचे भांडण मिटवले.

सलमान आणि शाहरुख खान यांनी पार्टीत मिठी मारली आणि 2008 पासून सुरु असलेले त्यांचे मतभेद संपवले. तेव्हापासून आतापर्यंत दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. त्यांचे वाद मिटवणारा व्यकी दुसरा कोणी नसून बाबा सिद्दीकी होते. त्यांनी बॉलीवूडच्या दोन खानांना एकत्र आणले.