AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : ‘औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा..’ वारीवरुन नितेश राणेंच आक्रमक प्रत्युत्तर

Nitesh Rane : "दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात, त्यावर आजमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरु झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्ष भर असत नाही पण तुमच्या रोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला" असं नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane : 'औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा..' वारीवरुन नितेश राणेंच आक्रमक प्रत्युत्तर
nitesh rane
| Updated on: Jun 23, 2025 | 12:42 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे बोलले आहेत. “आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आखले जातं आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय? आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही. मराठी सक्ती निश्चित आहे. हिंदी नको असेल, तर संस्कृत घ्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील, तर इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभर लावताय का? याचा विचार करुन आंदोलन करावं. हिंदुंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत” असं नितेश राणे म्हणाले.

“दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात, त्यावर आजमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरु झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्ष भर असत नाही पण तुमच्या रोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला. त्यावर अबू आजमीने आपलं थोबाड उघडावं. हे आम्ही इथे खपवून घेणार नाही. आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का?. वारीवर बोलण्याची हिंम्मत कोणी करू नये. आमची वारी अशीच सुरु राहणार” असं नितेश राणे यांनी सांगितलं.

‘राऊतने स्वतःला आरशात पहाव’

“मालेगाव माजी आमदार असो किंवा औरंग्याच्या पिलावळीतील राहिलेल्यांना औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा कार्यक्रम करावा लागेल” अशी आक्रमक भाषा नितेश राणे यांनी केली. “गद्दार कोण ह्यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत उबाठा ( शिवसेना) आणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालीय, त्याला राऊत जबाबदार आहे. राऊतने स्वतःला आरशात पहाव आणि मग आरोप करावे” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “गुलाबराव पाटील जे बोलले ते योग्य बोलले, राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा याची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. राऊत हाच शकुनी मामा आहे” असं नितेश राणे बोलले. “मंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. जी ऊर्जा मिळते त्यामुळे मी हिंदू राष्ट्रासाठी काम करू शकतो” असं नितेश राणे म्हणाले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.