सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा : प्रकाश आंबेडकर

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे (Prakash Aambedkar on Anil Deshmukh).

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा : प्रकाश आंबेडकर

पुणे : “सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे”, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे (Prakash Aambedkar on Anil Deshmukh). नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका ऑनलाईन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “राज्यातील काही पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते”. देशमुखांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Prakash Aambedkar on Anil Deshmukh).

“सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे. अनिल देशमुख यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

“या सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एका वेबसाईटला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

अनिल देशमुख यांनी केलेल्या धक्कादायक खुलासा केल्यानंतर राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली. या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत नावं जाहीर करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

देशाला रुग्णालयाची गरज, इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका

एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Published On - 5:15 pm, Sun, 20 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI