आजारपणामुळे पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, मग पालिकेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित कसे?; प्रवीण दरेकरांचा सवाल

मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नाही हे आम्ही समजू शकतो. देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात त्यावेळी केंद्राशी काही तरी मागणी अपेक्षित होती. मात्र, पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहतात आणि एका अॅपच्या उद्घाटनासाठी उपस्थितीत राहतात. मग 10 ते 12 तासात अशी काय जादूची कांडी फिरली की त्यांची प्रकृती ठणठणीत होते आणि ते महापालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले?

आजारपणामुळे पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, मग पालिकेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित कसे?; प्रवीण दरेकरांचा सवाल
Pravin Darekar and Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 5:16 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मात्र, आजारी असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थिती नव्हते. तर ठाकरे यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधानांच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर आज मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ या सुविधेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. याच मुद्द्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवाल केलाय.

मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नाही हे आम्ही समजू शकतो. देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात त्यावेळी केंद्राशी काही तरी मागणी अपेक्षित होती. मात्र, पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहतात आणि एका अॅपच्या उद्घाटनासाठी उपस्थितीत राहतात. मग 10 ते 12 तासात अशी काय जादूची कांडी फिरली की त्यांची प्रकृती ठणठणीत होते आणि ते महापालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे. समन्वयातून विकास करायचा असतो. केंद्रीय आरोग्यमंत्री आढावा घेतात तेव्हाही राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री उपस्थित राहत नाहीत, हे दुर्दैवं आहे, अशी घणाघाटी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ सुविधेचे लोकार्पण

दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थितीत राहिले. त्यानंतर आज महापालिकेच्या एका अॅपच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी उपस्थितीत लावली. नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका आहे. माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे. महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.

इतर बातम्या : 

‘तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरेंनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा’, चंद्रकांत पाटलांची पुन्हा मागणी

घातपाताचा मोठा कट उधळला! दिल्लीत बॅगमध्ये आढळलेल्या आयईडी बॉम्बचा खरा सूत्रधार कोण?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.