AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेला भाजपचं समर्थन, ‘त्या’ जागा बाजूला ठेवून नोकरभरतीची मागणी

मराठा आरक्षण वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असं दरेकर यांनी म्हटल आहे. ( Pravin Darekar Comment on Vijay Wadettiwar stand on OBC recruitment )

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेला भाजपचं समर्थन, 'त्या' जागा बाजूला ठेवून नोकरभरतीची मागणी
| Updated on: Oct 30, 2020 | 5:02 PM
Share

मुंबई: OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असं मदत व पुनर्वसन मं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं होतं. त्यांच्या या मताचे समर्थन करणारी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. ( Pravin Darekar Comment on Vijay Wadettiwar stand on OBC recruitment )

मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने संवेदनशीलपणाने लक्ष घालण्याची गरज आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असं दरेकर यांनी म्हटल आहे.

मराठा समाजातील आणि ओबीसी समाजातील तरुणांना नोकऱ्यांची गरज आहे. ओबीसी समाजात देखील मोठया प्रमाणात आर्थिकरित्या कमजोर कुटुंब आहेत त्यांच्याही नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यामुळे राज्य सरकारमधील एक मंत्री जर मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा, अशी मागणी करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

राज्यपाल नियुक्त जागांमध्ये निकषांचं पालन व्हावं:

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांचा प्रश्न कायम आहे. विधान परिषदेच्या बारा सदस्यांच्या यादीला मूर्त स्वरूप आलेले नाही. मात्र, त्या यादीवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार राज्यपाल आणि राज्य सरकारचा आहे. विधान परिषदेवरील 12 सदस्यांच्या जागांचे निकष आहेत. त्यांचे पालन व्हावे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर यांनी जातीनिहाय संख्येच्या आधारावर आरक्षण देण्यासंदर्भात नितीश कुमार यांनी जो मुद्दा मांडला आहे त्या संदर्भातील भाजपचे वरिष्ठ नेते च भूमिका मांडतील, असं स्पष्ट केले.

एसटीच्या खासगीकरणाचा डाव:

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला हवा पण त्यासाठी एसटी महामंडळाच्या जागा किंवा संपत्ती गहाण ठेवणे याचा आम्ही निषेध करतो त्याला आमचा विरोध आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे पण त्यासाठी कर्ज काढता येईल, असं प्रवीण दरेकर म्हणाले. महामंडळाच्या जागा किंवा संपत्ती गहाण ठेवणे हा कुठे तरी खासगीकरणाचा डाव असल्याचं दिसतंय, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

संबंधित बातम्या:

सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल : प्रवीण दरेकर

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा घोटाळा | विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.