सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल : प्रवीण दरेकर

भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 6:08 PM

रायगड : भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “एखाद्या घटनेचं राजकीय स्वार्थासाठी भांडवल करुन घेणे ही सुनिल तटकरेंची वृत्ती आहे. त्यांनी गेली 20 ते 25 वर्षात विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल,” असं मत दरेकर यांनी व्यक्त केलं. ते पेणमध्ये भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्याविरोधातील निषेध मोर्चात बोलत होते (BJP leader Pravin Darekar criticize NCP MP Sunil Tatkare in Pen).

प्रविण दरेकर म्हणाले, “प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडलं जातंय. भाजप या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सुडाचे राजकारण करत असताना तटकरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला. त्यामुळे पोलिसांनी सारासार विचार न करता रात्री 12.30 वाजता माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली. यातून तटकरेंनी पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे सिद्ध केलं. या प्रकरणाचा जाब येत्या विधानसभा अधिवेशनात सरकारला विचारणार आहे.”

“तटकरेंशी राजकीय मैत्री करणारे इतर पक्षांचेही अस्तित्व संपविण्याचे काम ते करीत आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यात 3 आमदार आहेत. तरी सुद्धा पालकमंत्री पद राष्ट्रवादीला गेले आहे. शिवसेनेच्या आमदारांनीही शासकीय कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून तक्रार दिली आहे. ही शिवेसेनेसाठी शोकांतिका आहे. तटकरे भाजपला 1 नंबर राजकीय क्षत्रू मानतात. आगामी काळात आम्ही पण तटकरेंना जशास तसे उत्तर देऊ,” असा इशारा दरेकर यांनी दिला.

दरेकर म्हणाले, “हा प्रश्न फक्त एका नगरपालिकेशी मर्यादित नाही, तर रायगड जिल्ह्याच्या भविष्याशी निगडित आहे. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे आणि सुदैवाने विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा याच रायगडच्या मातीतला आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही.”

“राज्यात आघाडी सरकार सत्तवेर आलं तेव्हाच लोकशाहीचा खून झाला”

“राज्यात आघाडी सरकार सत्तवेर आले तेव्हाच लोकशाहीचा खून झाला. शिवसेना भाजपच्या युतीला लोकांनी मतं दिली असून देखील हे अनैसर्गिक सरकार स्थापन केलं. श्रीवर्धन बँक बुडविली, गोरेगाव अर्बन बँक बुडवली गेली, पेण अर्बन बँक बुडाली हे सर्व बँक बुडवणारे तटकरे यांचे साथीदार आहेत. तटकरे यांच्या सुतार वाडीची झाडाझडती तुम्ही करणार आहात का?” असा सवालही दरेकरांनी रायगड पोलिसांना केला.

“16 ऑक्टोबर रोजी पेण न. प.च्या स्थायी समितीच्या सभेत नरदासचाळ येथील सांडपाण्याचा निचरा समस्या निवारण प्रश्नी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला. यावरुन मुख्याधिकारी यांनी गटनेत्याच्या विरोधात पेण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. परंतु पोलीस यंत्रणेने कोणतीही शहानिशा न करता 353 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. जनतेच्या प्रश्नासंबंधी जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींनवर गुन्हा दाखल करणे हे निषेधार्ह आहे. या विरोधातच आज (29 ऑक्टोबर) वैकुंठ निवास येथून निषेध मोर्चाचे आयोजन केलं आहे,” अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. या रॅलीचे न. प. कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले.

यावेळी व्यासपीठावर रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर, आमदार निरंजन डावखरे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, सभापती मोनिका महानवर, सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, रिपाई कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मोर्चात अनेक नागरिकही सहभागी झाले होते. तसेच पेणमधील व्यापारी, फळ विक्रेते, दुकानदार, भाजीवाले यांनी दुकाने बंद ठेऊन बंदमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा :

अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य सरकारची असमर्थता दर्शविणारे, प्रवीण दरेकरांची टीका

राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा, प्रवीण दरेकरांची मागणी

एकनाथ खडसेंचं शक्तीप्रदर्शन किळसवाणे, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

BJP leader Pravin Darekar criticize NCP MP Sunil Tatkare in Pen

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.