राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा, प्रवीण दरेकरांची मागणी

अतिवृष्टीमुळे कोकणात शेतीचे भयंकर नुकसान झाले असून कोकणासाठी सरकारनं विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (Pravin Darekar demands special package for farmers of Kokan)

राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा, प्रवीण दरेकरांची मागणी

सिंधुदुर्ग: नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर असलेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज कणकवलीत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. कोकणात शेतीचे भयंकर नुकसान झाले असून कोकणासाठी सरकारनं विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (Pravin Darekar demands special package for farmers of Kokan)

राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 10 हजार रुपयांची मदत म्हणजे कोकणच्या शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी पुसण्याचं काम असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. सरकारच्या या जाहीर झालेल्या मदतीनुसार कोकणातील शेतकऱ्यांना फक्त गुंठ्यामागे 100 रुपये तर एकरी हजार रुपये मदत मिळणार आहेत. सरकारने याद्वारे कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या कोकणात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. शनिवारी रत्नागिरीतील नुकसानाची पाहणी केल्यानंतर आज ते सिंधुदुर्गमध्ये आहेत. अतिवृष्टीमुळे कोकणातील शेती उद्धवस्त झाली आहे. कोकणातल्याशेतकऱ्याला सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील शेतकऱ्याची जमीन धारणा कमी आहे. येथील शेतकऱ्यांना फारच कमी मदत मिळणार आहे. ही मदत म्हणजे सरकारने शेतकऱ्यांची केलेली थट्टा आहे.

सरकारने जाहीर केलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजमध्ये शेतीसाठी फक्त 5500 कोटी जाहीर करण्यात आले आहेत. 4500 कोटी रुपये इतर विभागासाठी आहेत. यामुळे महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत फारच तोकडी आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

दरम्यान,  कोकणातील पाहणी दौऱ्यात प्रवीण दरेकर यांच्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड,आमदार नितेश राणे ही सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या : 

Pravin Darekar | “शेतकरी अडचणीत असताना सोहळे कसले करता” – प्रवीण दरेकर

एकनाथ खडसेंचं शक्तीप्रदर्शन किळसवाणे, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

(Pravin Darekar demands special package for farmers of Kokan)

Published On - 11:41 am, Sun, 25 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI