एनडीएची बैठक सुरु असतानाच शिवराज सिंह चौहान यांना पितृशोक

मुंबई : मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या वडिलांचं निधन झालंय. प्रेम सिंह चौहान हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाचं वृत्त मिळालं तेव्हा शिवराज सिंह हे दिल्लीत एनडीएच्या खासदारांच्या बैठकीसाठी उपस्थित होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही …

एनडीएची बैठक सुरु असतानाच शिवराज सिंह चौहान यांना पितृशोक

मुंबई : मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या वडिलांचं निधन झालंय. प्रेम सिंह चौहान हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाचं वृत्त मिळालं तेव्हा शिवराज सिंह हे दिल्लीत एनडीएच्या खासदारांच्या बैठकीसाठी उपस्थित होते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही प्रेम सिंह चौहान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय. वडिलांच्या निधनाचं वृत्त मिळताच शिवराज सिंह चौहान मुंबईसाठी रवाना झाले. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या प्रेम सिंह यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारासाठीच त्यांना मुंबईला हलवण्यात आलं होतं.

दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी सर्व 352 खासदार उपस्थित आहेत. एकट्या भाजपचेच 303 खासदार निवडून आले आहेत. मध्य प्रदेशात 29 पैकी 28 जागांवर भाजपने विजय मिळवलाय. मध्य प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर शिवराज सिंह यांची भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्त्वातच भाजपने मध्य प्रदेशात घवघवीत यश मिळवलंय.

शिवराज सिंह हे सलग 15 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 15 वर्षांच्या सत्तेनंतर ते पक्षाच्या कामामध्ये सक्रिय झाले. लोकसभेपूर्वी त्यांची निवड राष्ट्रीय उपाध्यक्षपदी करण्यात आली होती. हिंदी हर्टलँड असलेल्या तीनही राज्यांमध्ये शिवराज सिंह यांनी काम केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *