पुण्यात शिवसेनेला झटका, आशाताई बुचकेंचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

आशाताई बुचके शक्तीप्रदर्शन करत पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या भाजपप्रवेश करणार आहेत. जवळपास 15 वर्ष त्यांनी शिवसेनेचं काम केलं होतं

पुण्यात शिवसेनेला झटका, आशाताई बुचकेंचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
आशाताई बुचके
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 11:29 AM

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके भाजपात प्रवेश करणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचकेंचा पक्षप्रवेश होणार आहे. पुणे जिल्ह्यात भाजपचा शिवसेनेला जोरदार झटका मानला जातो.

आशाताई बुचके शक्तीप्रदर्शन करत पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या भाजपप्रवेश करणार आहेत. जवळपास 15 वर्ष त्यांनी शिवसेनेचं काम केलं होतं, मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल शिवसेनेने केला होता. महिलांचे मोठं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आशा बुचके यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्या भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत.

कोण आहेत आशाताई बुचके

आशाताई बुचके या वैष्णवधाम-बुचकेवाडी (ता. जुन्नर) येथील असून पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर आशाताई बुचके यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्वाची धुरा आली होती.

2014 मध्ये आशाताईंनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती.

शिवसेनेचे माजी मंत्री काँग्रेसमध्ये

दरम्यान, शिवसेनेला रामराम ठोकलेले माजी राज्यमंत्री अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत अशोक शिंदेंनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती धरला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मोहन जोशी, रणजितसिंह देशमुख या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

संबंधित बातम्या:

शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये

काल माजी राज्यमंत्र्याने शिवसेना सोडली, आता चार टर्म आमदार पक्षावर नाराज

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.