भाजपविरोधात पंजाच्या साथीने दोन हात करण्यासाठी खा. संजय काकडेंची धडपड

भाजपविरोधात पंजाच्या साथीने दोन हात करण्यासाठी खा. संजय काकडेंची धडपड

पुणे : सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या भावी खासदारावरुन वातावरण तापू लागलंय. भाजप यंदा भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे. तर आघाडीकडून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे चाचपणी करत आहेत. भाजप धक्कातंत्राने तरुण आणि मराठा उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे.  आमदार जगदीश मुळीक आणि नगरसेवक मुरलीधर मोहळ यांची नावं आघाडीवर आहेत. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय.

वाचापुणे लोकसभा: भाजपकडून जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ चर्चेत

पुण्यात अनिल शिरोळे हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. शिरोळे हे शांत आणि संयमी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. शिरोळे कोणत्याही वादात नाहीत. मात्र शिरोळेंच्या कामावर काहीजण नाराज असल्याची चर्चा आहे. शिरोळेंना पर्याय म्हणून मंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचंही नाव पुढे येतंय. मात्र भाजपाच्या अंतर्गत सर्वेत आमदार जगदीश मुळीक आणि नगरसेवक मुरलीधर मोहळ यांचं नाव आघाडीवर आहे. मराठा आणि तरुण तडफदार चेहरा म्हणून पक्षात या दोघांवर चर्चा सुरु आहे.

लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल

पुण्यात पक्षीय बलाबलात भाजपा वरचढ आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहाही मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा खासदार आणि राज्यसभेचे सहयोगी खासदार भाजपाचे आहेत. महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. भाजपाकडे केंद्रीय मंत्र्यासह तीन मंत्रीपदं असल्याने भाजपाचं पारडं जड आहे. तर काँग्रेसकडे एक विधान परिषद आणि राष्ट्रवादीकडे राज्यसभेची खासदारकी आहे.

विधानसभा मतदारसंघांचं चित्र

शिवाजी नगर – भाजप

कोथरूड – भाजप

पर्वती – भाजप

कसबा – भाजप

कँटोन्मेंट – भाजप

वडगाव शेरी – भाजप

वाचालोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!

2014 ला खासदार अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला. तर जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केलाय. वडगावशेरी मतदारसंघ वाढवण्यात त्यांचं योगदान आहे. तर मुरलीधर मोहळ यांनीही विधानसभा पोटनिवडणूक लढवली. युवा मोर्चापासून ते भाजपाचं संगठन वाढवत आहेत.

वाचापुणे लोकसभा : आघाडीची तयारी, भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र

आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे खासदार संजय काकडे हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत. काकडे भाजपचे सहयोगी खासदार असून भाजपात नाराज आहेत. त्यामुळे ते काँग्रेसकडून नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतायत. काकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतायत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर काकडेंनी अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांनी काँग्रेस देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं सांगितलंय.

संजय काकडे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे काकडेंनी भाजपाविरोधात बंड पुकारलंय. काकडे आता पंजाच्या साथीने भाजपाबरोबर दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. भाजपा विरोधात आवाज उठवून त्यांनी निशाणा साधलाय. भाजपच्या लोकल सोंगाड्यांनी माझा वापर केला, तर भावासारख्या मुख्यमंत्र्यांनीनी लाथ मारल्याचा आरोप काकडेंनी केलाय.

Published On - 9:28 pm, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI