विखे पाटील आणि मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या तारखा ठरल्या!

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीतील नाराज नेते मुलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत दिसत आहेत. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर रणजितसिंह मोहित पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयसिंह मोहित पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, विखे …

विखे पाटील आणि मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या तारखा ठरल्या!

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीतील नाराज नेते मुलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत दिसत आहेत. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर रणजितसिंह मोहित पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयसिंह मोहित पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, विखे पाटील आणि मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेशही निश्चित झाला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीले हे येत्या 12 एप्रिल रोजी अहमदनगरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत भाजपप्रवेश करतील, तर 17 एप्रिल रोजी अकलुजमध्ये राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांची नाराजी

मुलगा सुजय विखे यांना नगर दक्षिणमधून लढण्याची इच्छा असतानाही, राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडली नाही. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत. सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करुन, नगर दक्षिणमधून उमेदवारीही मिळवली. मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसवर अद्याप नाराज आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना, आता मोदींच्या 12 एप्रिलच्या नगरमधील सभेत भाजपमध्ये विखे दाखल होतील, हे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विजयसिंह मोहिते पाटलांची नाराजी

माढ्याच्या जागेवरुन गेल्या महिन्या-दोन महिन्यात प्रचंड राजकीय हालचाली झाली. माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांची तिकीट कापून, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचे ठरवले. मात्र, त्यानंतर एकाच घरातील तिघे निवडणुकीच्या रिंगणात नको, असे कारण देत शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. मात्र, त्यांच्या माघारीमागे मोहित पाटलांची नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यानंतर काहीच दिवसात विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे बडे नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेल्यास, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल, यात शंका नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *