5

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Rahul Gandhi and Priyanka Gandhi headed towards hathras to meet victims family)

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 4:23 PM

उत्तर प्रदेश : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Rahul Gandhi and Priyanka Gandhi headed towards hathras to meet victims family)

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसंच राहुल गांधी यांची  कॉलर पकडून ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

पोलिसांच्या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी यांचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले. त्यांच्या हाताला मुकामार लागला. यानंतर प्रियांका गांधी काहीशा घाबरल्या. झाल्या प्रकरणावर बोलताना ‘अशा घटनांवेळी असे प्रकार होत असतात’ ,अशी संयमी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

दुसरीकडे राहुल गांधी यांची मतांच्या लाचारीसाठी नौटंकी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, अशी टीका भाजपच्या वतीने केली जातीये.

सलग दोन दिवसांतील सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणांनी यूपीसह संपूर्ण देश हादरला आहे. दोन्ही घटनांतील पीडितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधींसह (Priyanka Gandhi) हाथरसच्या दिशेने रवाना झाले. ते हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. (Rahul Gandhi and Priyanka Gandhi headed towards hathras to meet victims family).

राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) हाथरसमध्ये येणार असल्याने, हाथरस (Hathras) जिल्ह्याची सीमा आज (1 ऑक्टोबर) पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी यूपी सामूहिक बलात्काराने हादरले

हाथरस (hathras) घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशच्या बलरामपुर (Balrampur) भागात 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपींनी पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची कंबर आणि पाय तोडले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच पीडितेचा मृत्यू झाला आहे .

पीडित मुलगी 29 सप्टेंबरच्या सकाळी कॉलेजला अॅडमिशन घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. या वेळी कारमधून आलेल्या 3-4 जणांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. नराधमांनी अत्याचार करून तिच्या कंबरेची आणि पायाची हाडेदेखील मोडली. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी पीडिता जखमी अवस्थेत घरी पोहोचली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा आधीच तिचा मृत्यू झाला. (Rahul Gandhi and Priyanka Gandhi headed towards hathras to meet victims family)

प्रियांका गांधींची उत्तर प्रदेश सरकारवर टीका

या सगळ्या प्रकारा दरम्यान, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी हाथरस प्रकरणी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज पसरले आहे. मार्केटिंग आणि भाषणाने कायदा व सुव्यवस्था निर्माण होत नाही. मुख्यमंत्र्यांनी उत्तरे द्यायची वेळ आली आहे. जनतेला उत्तरे हवी आहेत’, अशा आशयाचे ट्विट करत, प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले आहे.  ‘मलाही 18 वर्षांची मुलगी आहे. अशा घटना पहिल्या आणि ऐकल्या की संताप होते’, असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

राहुल गांधीचीही आक्रमक भूमिका

या क्रूर घटनांनंतर उत्तर प्रदेश सरकारवर सगळ्या स्तरांतून टीका होते आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनीदेखील (Rahul Gandhi) हाथरस प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. हाथरस पीडितेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या कुटुंबालादेखील आतमध्ये येण्याची परवानगी दिली गेली नाही. ‘भारताच्या लेकीवर अत्याचार करुन, तिची हत्या केली जाते. सत्य लपवते जाते आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्कदेखील हिरावला जातो आहे’, असे ट्विट करत राहुल गांधींनी योगी सरकारवर टीका केली आहे.

गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करा : अखिलेश यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ट्विट करत यूपी सरकारवर टीका केली आहे. ‘हाथरसनंतर आता बलरामपुरमध्येही एका मुलीवर सामूहित बलात्कार आणि निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा मोठा अपराध आहे. भाजप सरकारने बलरामपुरमध्ये हाथरससारखा निष्काळजीपणा करु नये, तर गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या : 

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

UP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Non Stop LIVE Update
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?