पत्रकाराला आमदाराची मारहाण, कारवाईचा बडगा पोलिस अधिकाऱ्यांवर

अलिबाग : ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मतमोजणी कक्षात शेकाप नेते आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. हे प्रकरण मागील तीन दिवसांपासून रायगडसह महाराष्ट्रातील अनेक पत्रकार सघंटनांनी लावून धरलं आहे. आता याच प्रकरणात रायगड जिल्ह्यातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचेही समोर आल्याने नेत्यांच्या अरेरावीचा फटका नाहक पोलीस अधिकाऱ्यांना भोगावा लागल्याने पोलीस दलात …

पत्रकाराला आमदाराची मारहाण, कारवाईचा बडगा पोलिस अधिकाऱ्यांवर

अलिबाग : ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मतमोजणी कक्षात शेकाप नेते आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. हे प्रकरण मागील तीन दिवसांपासून रायगडसह महाराष्ट्रातील अनेक पत्रकार सघंटनांनी लावून धरलं आहे. आता याच प्रकरणात रायगड जिल्ह्यातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचेही समोर आल्याने नेत्यांच्या अरेरावीचा फटका नाहक पोलीस अधिकाऱ्यांना भोगावा लागल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

23 मे रोजी देशभरात लोकसभा मतदार सघांची मतमोजणी चालू होती. साधारण दुपारी 12 नतंर रायगडचे चित्र स्पष्ट होऊ लागले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याची चाहूल लागताच सहकारी पक्षातील अनेक नेत्यांनी  मतमोजणीच्या ठिकाणी नेहुली क्रीडा संकुल गाठले. यामध्ये शेकाप नेते आमदार जयंत पाटील, आमदार सभाष पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, माजी आमदार सुप्रिया पाटील, माजी बाधंकाम सभापती चित्रा पाटील यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे कोणतेही ओळखपत्र नसताना सुनील तटकरे यांच्या विजयाच्या उन्मादात कोणाचीही तमा न बाळगता मतदान कक्षामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला.

तिथेच पत्रकार कक्षाजवळ सुनील तटकरे हे पत्रकारांशी चर्चा करत असताना आमदार जयंत पाटील यांनी लोकसत्ताचे प्रतिनीधी हर्षद कशाळकर यांना दोन कानशिलात लगावल्या. कशाळकरही आक्रमक झाले, तेवढ्यात जयंत पाटील यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी हर्षद कशाळकर यांना धक्काबुक्की केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सुनील तटकरे यांनी तेथून काढता पाय घेतला. परंतु पत्रकारांनी लागलीच पोलीसांना बोलावून सबंधितांवर कारवाई करावयास भाग पाडले. तेथील वातावरण पाहुन आमदार जयंत पाटील यांच्यासह अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना पोलिसांनी मतमोजणी कक्षातून बाहेर काढले.

यानतंर पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरल्यावर पोलिसांनी आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार सुभाष पाटील, आमदार धैर्यशील पाटील आणि 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल केला व निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या वतीनेही पोलिसांनी चार आमदार आणि सहकाऱ्यांवर अनधिकृतपणे प्रवेशाबद्दलही गुन्हा दाखल केला.

आता याच प्रकरणात आमदार जयंत पाटील आणि इतर सहकाऱ्यांना अनधिकृतपणे प्रवेश दिल्यानतंर सुरक्षेत हयगय बाळगल्यामुळे जिल्ह्यातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला असून दोन डीवायएसपी (उप विभागीय पोलीस  अधिकारी ) दोन पोलीस निरिक्षक, एक सहाय्यक पोलीस निरिक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे अधिकृत सूत्रांकडुन सांगण्यात आले. सबंधित अधिकाऱ्यांच्या खुलाश्यानतंर काय कारवाई केली जाते याकडे पत्रकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *