Raj Thackeray : बृजभूषण सिंह यांना आवरा, राज ठाकरेंसाठी कांचनगिरी यांची थेट मोदींना साद, मोदी कांचनगिरींचं ऐकणार?

Raj Thackeray : बृजभूषण सिंह यांना आवरा, राज ठाकरेंसाठी कांचनगिरी यांची थेट मोदींना साद, मोदी कांचनगिरींचं ऐकणार?
भाजप खासदाराची राज ठाकरेंवर टीका
Image Credit source: TV9 Marathi

बृजभूषण यांना राज ठाकरे यांना रोखण्याचा कोणताही हक्क नाही. अयोध्याची भूमी ही सर्वांसाठी एक समान आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की बृजभूषण यांना रोखावं, अशी मागणी कांचन गिरी यांनी मोदींकडे केली आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 18, 2022 | 7:42 PM

अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्यासाठी आता कांचन गिरी यांनी थेट पंतप्रधान मोदींना (Pm Modi) पत्र पाठवलंय. राज ठाकरे यांना अयोध्येत (Ayodhya Visit) निमंत्रण मी दिले, बृजभूषण यांना राज ठाकरे यांना रोखण्याचा कोणताही हक्क नाही. अयोध्याची भूमी ही सर्वांसाठी एक समान आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की बृजभूषण यांना रोखावं, अशी मागणी कांचनगिरी यांनी मोदींकडे केली आहे. महाकाल मानव सेवा संस्थानच्या अध्यक्ष कांचनगिरी यांचे पत्र टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलंय. आज महाराष्ट्रात लाखो उत्तर भारतीय शांततेत राहत आहेत, या सगळ्या बाबतीत पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालावं, असेही कांचनगिरी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी या प्रकरणात लक्ष घालून राज ठाकरेंच्या दौऱ्याचा मार्ग मोकळा करणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दौऱ्याबाबत नेमका वाद काय?

पुढच्या आठवड्यात पुण्यात राज ठाकरेंची सभा पार पडत आहे. त्यानंतर काही दिवसातच राज ठाकरे यांचा अयोध्या दौराही पार पडत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधावर राज ठाकरे काय बोलणार, याकडेही मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांचं लक्ष असणार आहे. राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ नये, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूण सिंह यांनी घेतली आहेत. मनसेकडून मात्र यावर अद्याप प्रतिक्रिया आली नाही.

धर्मसंसदेतही याचे पडसाद

यावरून कांचनगिरी आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या खुलेआम युक्तीवाद झाला आहे. राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून विरोध करू नये अशी मागिणी सतत कांचनगिरी यांच्याकडून करण्यात येत आहे. तर मनसेकडून मारहाण झालेल्या कथित लोकांना बृजभूषण सिंह यांनी पत्रकार परिषदेत आणले होते. हा वाद हा धार्मिक नाही राजकीय आहे, तसेच राज ठाकरे यांचा दौरा हा धार्मिक नसून राजकीय असल्याचे भाजप खासदार वारंवार सांगत आहेत.

राज ठाकरे उत्तर भारतीयांचे गुन्हेगार-बृजभूषण

उत्तर भारतीयांना राज ठाकरे यांनी मारहाण केल्याने ते त्यांचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्याथा त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे सांगत बृजभूषण सिंह यांनी चलो अयोध्येची हाक दिली आहे. तसेच आधीही त्यांनी रॅली काढत, आणि सभा घेत राज ठाकरेंविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे आता हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें