राज ठाकरेंची घोषणा, उद्धव ठाकरेंना भेटणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली (Meeting of Raj Thackeray and CM Uddhav Thackeray).

राज ठाकरेंची घोषणा, उद्धव ठाकरेंना भेटणार
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 8:39 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली (Meeting of Raj Thackeray and CM Uddhav Thackeray). महाराष्ट्रात पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही, असे काही भाग आहेत. तेथे बाहेरच्या देशातील मौलवी येत असून मोठं कारस्थान तयार होत आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं (Meeting of Raj Thackeray and CM Uddhav Thackeray).

राज ठाकरे म्हणाले, ” माझ्याकडे काही महत्त्वाची माहिती आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जेथे अनेक बाहेरच्या देशातील मौलवी येतात. ते काय करतात माहिती नाही. कारण तेथे पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही. त्या ठिकाणी काय शिजतंय, काय होणार आहे हे कळत नाही. परंतू मला जे कळलं आहे त्याप्रमाणे तेथे काही तरी मोठं कारस्थान घडवण्याचा डाव आतमध्ये शिजतो आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मी आज तुम्हाला कुठलीही जागा सांगणार नाही. मी योग्यव्यक्ती असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटून ही माहिती देणार आहे. जर त्यांना ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरज आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे. त्यासाठी मी त्यांना जाऊन भेटणार आहे.”

यावेळी राज ठाकरे यांनी देशातून पहिल्यांदा बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना बाहेर काढण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, “आपण आज अनेक ज्वालामुखी आणि बॉम्बवर बसलो आहोत. कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून यात सर्वात पहिल्यांदा या देशात आलेल्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलं पाहिजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहे. ते गेलेच पाहिजे.”

भारतात अमेरिकन आणि ब्रिटीश नागरिकांना विसा विचारून कशासाठी विचारलं जातं. मात्र, देशाच्या सीमेवरील इतर भागातून लोक सरळ देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर कायदे करावे लागतील. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.