AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | आईच्या डोळ्यात अश्रू, हात धरुन राज ठाकरेंना गाडीपर्यंत सोडलं

राज ठाकरेंना घरातून गाडीपर्यंत सोडण्यासाठी त्यांच्या मातोश्री आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. राज ठाकरेंनी आईचा हात पकडला होता. गाडीच्या दरवाजापर्यंत राज यांची आई आली होती.

Raj Thackeray | आईच्या डोळ्यात अश्रू, हात धरुन राज ठाकरेंना गाडीपर्यंत सोडलं
| Updated on: Aug 22, 2019 | 3:27 PM
Share

Raj Thackeray मुंबई :  कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी साडेदहा वाजता कृष्णकुंज या निवासस्थानावरुन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. राज ठाकरे यांचा 9 नंबरचा आकडा लकी बोलला जातो. राज ठाकरे लँड क्रूझर या त्यांच्या नऊ नंबरची गाडीत ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसले. त्यांच्या मागे इनोव्हा गाडी होती,  ती सुद्धा नऊ नंबरची. त्यामध्ये राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तर त्याच गाडीत मागे अमित ठाकरे यांची पत्नी मिताली आणि आई शर्मिला ठाकरे बसल्या होत्या.

राज ठाकरे सकाळी 10.30 वाजता घरातून ईडी कार्यालयाकडे निघाले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली उपस्थित होते. राज ठाकरे गाडीपर्यंत गेले त्यावेळी त्यांच्या आईने त्यांचा हात पकडला होता. त्यावेळी आईच्या डोळ्यात अश्रू होते.

राज ठाकरेंना घरातून गाडीपर्यंत सोडण्यासाठी त्यांच्या मातोश्री आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. राज ठाकरेंनी आईचा हात पकडला होता. गाडीच्या दरवाजापर्यंत राज यांची आई आली होती.

राज ठाकरे सकाळी 10.30 वा घरातून निघाले.  राज ठाकरे कृष्णकुंजवरुन सिद्धिविनायक मंदीर, प्रभादेवी, सासमिरा, वरळी, हाजीअली, पेडर रोड, जसलोक रुग्णालय, बाबुलनाथ मंदीर, विल्सन कॉलेज, मरीन लाईन्स, आझाद मैदान, सीएसटी स्टेशन, पंचम पुरीवाला, शेर-ए-पंजाब, ग्रँड हॉटेल या मार्गे 11.30 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले. बरोबर 1 तास त्यांना प्रवासाला लागला. हा मार्ग पूर्णत: रिकामा करण्यात आला होता.

त्या आधी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली. मनसे नेते संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कोहिनूर स्क्वेअर टॉवर

कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपचं कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका होती, यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.

गेली तीन दिवस उन्मेष जोशी यांची ईडीने चौकशी केली. तर राजन शिरोडकर यांनाही ईडीने दोन दिवस चौकशीसाठी बोलावलं होतं. आज या दोघांची चौकशी नाही. आज केवळ राज ठाकरे यांचीच चौकशी होत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.