राज यांचे व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर फटकारे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे सुरुच आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘पाडवा’च्या (बलिप्रतिपदा) निमित्ताने रेखाटलेल्या व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एका गरीब शेतकऱ्याच्या घरी ओवाळणी करण्यासाठी गेले आहेत. विशेष म्हणजे या दोघांना महिलेच्या …

राज यांचे व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर फटकारे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे सुरुच आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘पाडवा’च्या (बलिप्रतिपदा) निमित्ताने रेखाटलेल्या व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे.

या व्यंगचित्रात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एका गरीब शेतकऱ्याच्या घरी ओवाळणी करण्यासाठी गेले आहेत. विशेष म्हणजे या दोघांना महिलेच्या वेशात दाखवलं आहे. यामध्ये बळीराजाची पत्नी आपल्या नवऱ्याला बोलत आहे, “ऐका, आत्ताच सांगून ठेवते, एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा!” असं कॅप्शन या व्यंगचित्राला दिलं आहे. पाडवा (बलिप्रतिपदा) असा मथळा देऊन व्यंगचित्र साकारण्यात आलं आहे.

आपल्या भाषणातून आणि व्यंगचित्राच्या कलेतून नेहमीच चर्चेत राहणारे राज ठाकरे सध्या आपल्या ठाकरे शैलीतून सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधत आहेत. धनत्रयोदशीपासून राज ठाकरेंनी सुरु केलेल्या व्यंगचित्रांची मालिका सध्या लोकांच्या चांगलीच पसंतीची ठरली आहे. आपल्या या व्यंगचित्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

दिवाळीच्या सुरुवातीला राज यांनी अमित शाहावर निशाणा साधत व्यंगचित्र रेखाटलं होतं. तर अभ्यंगस्नान या मथळ्याखाली त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चित्र रेखाटलं. हे व्यंगचित्रही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *