महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरे चिडले आणि….

राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरे चिडले आणि....
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 9:11 PM

मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर ह्ललाबोल केला. यांनतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील या निर्णयामुळे चिडले आहेत. थेट ट्विट करत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल  राज ठाकरे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

हा प्रकार गंभीर आहे.महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टर अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे सांगितले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत गुजरातमध्ये या प्रकल्पाचे स्वागत केले आहे.

ही कंपनी 95 टक्के राज्यात येणार होती. पण अचानक ती गुजरातला गेली आहे. हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती.

Non Stop LIVE Update
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.