भर सभेत भाषण करण्याऐवजी मोदी म्हणाले, क्षमा चाहता हूँ…. काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल राजस्थानात होते. येथील एका दुर्गा महोत्सव कार्यक्रमात पोहोचले. कार्यकर्त्त्यांनी जयघोष केला. अनेक जिल्ह्यांतून मोदींचं भाषण ऐकण्यासाठी लोक आले होते.

भर सभेत भाषण करण्याऐवजी मोदी म्हणाले, क्षमा चाहता हूँ.... काय घडलं?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी

|

Oct 01, 2022 | 8:52 AM

जयपूरः राजस्थानातल्या (Rajasthan) एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पोहोचले. अबू रोड (Abu Road) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोदी पोहोचले. कार्यकर्त्यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. पण या सभेत भाषण न करण्याचा निर्णय मोदींनी घेतला. माइकसुद्धा हातात न घेता, त्यांनी भर सभेची माफी मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कायद्याचं पालन करण्यासाठी केलं. कारण त्यांना कार्यक्रमात पोहोचायला उशीर झाला होता. रात्रीचे दहा वाजून गेले होते. त्यामुळे आज भाषण होणार नाही, पण पुन्हा तुमच्या इथे येऊन व्याजासहित या प्रेमाचं कर्ज फेडू, असं आश्वासन मोदींनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा शुक्रवारचा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. शुक्रवारी सिरोही जिल्ह्यातील आबू रोड येथे मोदी एका सभेला संबोधित करणार होते.

पण रात्री दहा वाजेच्या नंतर ते कार्यक्रम स्थळी पोहोचले. त्यामुळे त्यांनी एखादा मिनिट लोकांशी माइक न घेताच संवाद साधला.

ते म्हणाले, मला पोहोचायला उशीर झालाय. दहा वाजलेत. नियम आणि कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. मी माफी मागतो….

पण तुमचं हे जे प्रेम आहे, ते व्याजासहित परत करेन, मी पुन्हा नक्की येथे येईन… असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

मोदींच्या या बोलण्यानंतर सभेत भारत माता की जय… असा जयघोष झाला. मोदींनीही घोषणा दिल्या…

एवढंच नाही तर सभामंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा मंचावर नतमस्तक झाले. लोकांसमोरही हात जोडले , मंचावरील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोरही हात जोडले आणि मंचावरून निघाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारच्या दिवसातला हा सातवा कार्यक्रम होता. काल त्यांनी गांधीनगर येथे वंदे भारत एक्सप्रेसचं तसेच अहमदाबाद मेट्रोचं उद्घाटन केलं. त्यानंतर काही कार्यक्रम केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७२ वर्षांचे असून नवरात्रीदरम्यान ते उपवास करतात, अशी माहिती एका भाजप नेत्याने ट्विट केली आहे.

आबू रोड येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप नेता सतीश पुनिया यांनी मोदींचं साफा घालून स्वागत केलं. यावेळी गजेंद्र सिंह शेखावत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, खासदार देव जी पटेल यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें