AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022 : गुलाल उधळणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ऑफकोर्स… पत्रकारांच्या पार्टीच्या प्रश्नावर म्हणाले संध्याकाळी परत येतो!

मुख्यमंत्री आज जातीने विधानभवनात हजर होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास ते विधान भवनातून आपल्या निवासस्थानाकडे निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गुलाल उधळणार का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्स्फुर्तपणे त्यांच्या प्रश्नाला दाद देत ऑफकोर्स असं एका वाक्यात उत्तर दिलं.

Rajya Sabha Election 2022 : गुलाल उधळणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ऑफकोर्स... पत्रकारांच्या पार्टीच्या प्रश्नावर म्हणाले संध्याकाळी परत येतो!
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 4:40 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) रणधुमाळीच विजय आमचाच असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे यंदाच्या राज्यासभा निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जातीने विधानभवनात हजर होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास ते विधान भवनातून आपल्या निवासस्थानाकडे निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गुलाल उधळणार का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्स्फुर्तपणे त्यांच्या प्रश्नाला दाद देत ऑफकोर्स असं एका वाक्यात उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चारही उमेदवार विजयी होतील असा त्यांना विश्वास आहे हे स्पष्ट होतं.

राज्यसभा निवडणुकीसाठी आज विधान भवनात मतदान पार पडलं. शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान शिवसेनेकडून मोठी खबरदारी करण्यात आलेली पाहायला मिळालं. या निवडणुकीत घोडेबाजाराचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेनं आपले सर्व आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते. त्यानंतर आज मतदान पार पडलं. त्यावेळी मुख्यमंत्री मतदानावेळी विधान भवनात ठाण मांडून होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री विधान भवनातून निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एक पार्टी नक्की म्हणायची का? असा प्रश्न केला. तेव्हा मला घरी जाऊन येऊ द्या. संध्याकाळी येतोच असं उत्तर त्यांनी दिलं. तर एका पत्रकाराने विजयाचा गुलाल उधळणार का? असं विचारलं असता ऑफकोर्स असं उत्स्फुर्त उत्तर त्यांनी दिलं.

मतदानावेळी आक्षेपाचं राजकारण

जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केलाय.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.