.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022 : आमदार सुहास कांदे यांचं मत बाद! भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय, शिवसेनेला मोठा धक्का

सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका आपल्या पोलिंग एजंटला मत दाखवताना इतरांनाही दाखवलं, असा आक्षेप भाजपनं घेतला होता. त्यामुळे आता सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं आहे.

Rajya Sabha Election 2022 : आमदार सुहास कांदे यांचं मत बाद! भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय, शिवसेनेला मोठा धक्का
सुहास कांदे यांचं मत बाद, शिवसेनेला धक्काImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 11, 2022 | 1:24 AM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, यावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. कारण आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं आहे. सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आपली मतपत्रिका आपल्या पोलिंग एजंटला मत दाखवताना इतरांनाही दाखवलं, असा आक्षेप भाजपनं घेतला होता. त्यामुळे आता सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं आहे. 10 जून रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान झालं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला (Counting) सुरुवात होणार होती. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांच्या काही आमदारांच्या मतांबाबत आक्षेप घेण्यात आला त्यामुळे रात्री उशिरा मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

सुहास कांदेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, माझं मत बाद झालं याबाबत कायदेशीर पुरावा माझ्याकडे आलेला नाही. माझ्याकडे ते आलं तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कायदेतज्ज्ञांना दाखवून पुढचा निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना फोनवरुन दिलीय.

आता मतांचं गणित कसं असणार?

एक मत बाद झाल्याने आता 284/7+1 = 40.58. म्हणजे आता मतांचा कोटा 41 झाला आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीची 41 मते ज्या उमेदवाराला पडणार तो उमेदवार विजय होणार आहे.

सुहास कांदेंवरचे आक्षेप काय?

>> मतदारानं मतप्रत्रिकेची घडी घालणं गरजेचं असतं, पण कांदेंनी मतपत्रिकेची घडी घातली नाही >> सुहास कांदेंनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतदान कक्षाच्या बाहेरुन मतपत्रिका दाखवली >> त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यास सांगितलं

284 जागांची मतमोजणी होणार

राज्यसभा निवडणुकीसाठी एकूण 285 आमदारांनी मतदान केलं होतं. त्यापैकी शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने तसं जाहीर केलंय. त्यामुळे आता 284 आमदारांचं मत गृहित धरुन मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. 

आव्हाड, ठाकुरांचं मत वाचलं

भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या मतांबाबतही आक्षेप घेतला होता. आव्हाड यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटलांच्या तर यशोमती ठाकूर यांनी आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिल्याचा आक्षेप भाजपचा होता. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचं मत वैध ठरवलं आहे. त्यामुळे वैयक्तिक आव्हाड, ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा दिसाला मिळालाय.

भाजपलाही दिलासा

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिल्याचा आक्षेप नोंदवला होता. तर रवी राणा यांनी हनुमान चालिसा दाखवत हिंदू मतं प्रभावित करण्याचा आक्षेप शिवसेनेनं नोंदवला होता. मात्र, या दोघांना आणि भाजपला मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर