AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election 2022 : ठाकरे सरकारला धोका आहे का? पवारांनंतर संजय राऊतांनीही गणित मांडण्याचा प्रयत्न केला…

Rajyasabha Election Results 2022 : महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात असल्याची चर्चा आहे. त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता संजय राऊतांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rajyasabha Election 2022 : ठाकरे सरकारला धोका आहे का? पवारांनंतर संजय राऊतांनीही गणित मांडण्याचा प्रयत्न केला...
कुठे दगाफटका झाला? संजय राऊतांनी केली शरद पवारांशी चर्चा , आता विधानपरिषदेसाठी सावध
| Updated on: Jun 11, 2022 | 12:00 PM
Share

मुंबई : संजय पवार यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी आणि विशेषत: संजय राऊतांनी (Sanjay Raut) अथक प्रयत्न केले पण त्याला यश आलं नाही. संजय पवार पराभूत झाले अन् धनंजय महाडिकांचा (Dhananjay Mahadik) विजय झाला. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात असल्याची चर्चा आहे. त्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं. सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी म्हटलं त्यानंतर आता संजय राऊतांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारला धोका? राऊत म्हणाले…

राज्यसभेतील पराभानंतर संजय राऊतांना ठाकरे सरकारला धोका असल्याचं बोललं जातंय. त्याबाबत संजय राऊतांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “आघाडीवर कोणताही परिणाम नाही. घोडेबाजारातील घोड्यांमुळे कोणताही परिणाम होत नाही. विशेषत महाराष्ट्रता घोडे तिकडे असतील इकडे असतील हरभरे टाकले की ते कुठेही जातात”, असं राऊत म्हणालेत.

“मलाही पाडण्याचा डाव”

“मलाही पाडायचा डाव होता. पण ते शक्य होऊ शकलं नाही. मी फक्त माझ्यासाठी पक्षाने दिलेल्या 42 मतांवरच लढत होतो. त्यातील त्यांनी एक मत बाद करण्याचा प्रयत्न केला. मीही एकही जास्त मत घेतलं नाही. कारण आमच्यातही अटीतटीची लढत होती. मी काही 48-50 अशी मते घेतली नाही. मी फक्त 42 मतांवर लढलो आणि जिंकलो”, असंही राऊत म्हणालेत.

“असंच घोडेबाजार करत राहा”

“कांदे यांचं मत का बाद केलं हा संशोधनाचा विषय आहे. कांदे याचं मत ज्या कारणासाठी बाद झालं. त्याच कारणासाठी आम्ही मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेतला. अमरावतीच्या शहाण्याचं मत बाद व्हायला हवं होतं. यांना पहाटेची फार सवय आहे पापकर्म करायची. त्यांचा पहाटेपर्यंत उपक्रम सुरू होता. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा घोडेबाजार करत राहा”, असंही राऊतांनी म्हटलंय.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.