AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वीजबिल माफ करा, अन्यथा रस्त्यावर उतरु’, भाजप खासदार रक्षा खडसे आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे वीजबिलाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्या आहेत (Raksha Khadse warn Thackeray government on extra electricity bill).

'वीजबिल माफ करा, अन्यथा रस्त्यावर उतरु', भाजप खासदार रक्षा खडसे आक्रमक
| Updated on: Nov 18, 2020 | 5:13 PM
Share

जळगाव : “ग्राहकांना वीजबिलात कोणतीही सवलत मिळणार नाही. वीजबिल भरावेच लागतील”, अशी भूमिका ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे वीजबिलाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्या आहेत. ‘राज्य सरकारने वीजबिल माफ केलं नाही, तर रस्त्यावर उतरु’, असा इशारा रक्षा खडसे यांनी दिला आहे. “राज्य सरकारने कोरोना संकटात सर्वसामान्य नागरिकांचे वीजबिल माफ करुन दिलासा द्यावा”, अशी मागणी त्यांनी केली आहे (Raksha Khadse warn Thackeray government on extra electricity bill).

“सरकारने वीजबिल माफ करायला हवं. ग्राहकांना कोरोना संकटात वीजबिल भरणं अशक्य आहे. कोरोना संकटामुळे काही नागरिकांना एकवेळच्या जेवणाची व्यवस्था करणे कठीण आहे. ते वीजबिल भरतील कसे?”, असा सवाल रक्षा खडसे यांनी केला (Raksha Khadse warn Thackeray government on extra electricity bill).

“वीजबिल माफ झाले नाही तर महाविकास आघाडी सरकारविरोधात नागरिकांच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. कोरोना परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना दिलासा द्यायला हवा”, अशी मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे.

नितीन राऊत नेमकं काय म्हणाले?

वीज वापरली तितकेच बील आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बील नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बील सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले.

विधानसभेत हक्कभंग आणणार : बबनराव लोणीकर

दरम्यान, भाजप नेते बबनराव लोणीकर यांनीदेखील वीजबिलाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “वीजबिलामध्ये सवलत मिळेल असं सांगणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणतीही सवलत मिळणार नाही असे सांगितले. महाराष्ट्र सरकारचा हा निर्लज्जपणा आहे,” अशी घणाघाती टीका भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली. तसेच, विधानसभेच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याची माहितीही लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संबंधित बातम्या : 

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

‘विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?’, सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.