पदोन्नती आरक्षणप्रश्नी रामदास आठवलेंकडून शरद पवारांची भेट, बैठकीत नेमकं काय ठरलं?

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केलीय.

पदोन्नती आरक्षणप्रश्नी रामदास आठवलेंकडून शरद पवारांची भेट, बैठकीत नेमकं काय ठरलं?
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 5:13 PM

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये. ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर व्हावं. यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे या मुद्द्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होऊन सहमती झालीय. याबाबत स्वतः रामदास आठवले यांनी माहिती दिलीय. त्यांनी आज (9 जून) सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांशी मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या विषयावर चर्चा केली. त्यावेळी शरद पावर यांनी मराठा अरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं (Ramdas Athawale meet Sharad Pawar over reservation in promotion issue).

रामदास आठवले म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी रिपब्लिकन पक्षाने नेहमी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट रद्द करण्यास सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत. मीही केंद्रात प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असं मत मी शरद पवार यांच्याशी चर्चा करताना मांडलं.”

“शरद पवार यांनी सांगितलं की राज्य सरकार कायदेशीर बाबी तपासून मंत्रीमंडळाशी चर्चा करून याबाबत लवकर अनुकूल निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील,” असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं. शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीवेळी रामदास आठवले यांच्यासोबत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.

बॅक टू पॅव्हेलियन या, फडणवीसांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पॅव्हेलियन यावं. भाजपसोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, अशी सादच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे. रामदास आठवले यांनी ‘टिव्ही9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन यावं. भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी आहे, असं आठवले म्हणाले.

30 वर्षाच्या मैत्रीचा विचार करा

शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची काल भेट झाली. या भेटीमधून राज्याला बऱ्याच अपेक्षा आहेत, असं ते म्हणाले.

हेही वाचा :

बॅक टू पॅव्हेलियन या, फडणवीसांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद

जीएसटीचा परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन: आठवले

दिल्लीत जाऊन मोदींना फक्त एवढं सांगा, अजित पवारांची रामदास आठवलेंना विनंती

व्हिडीओ पाहा :

Ramdas Athawale meet Sharad Pawar over reservation in promotion issue

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.