AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाही; मेळाव्या आधीच रामदास कदमांचा खडा?

शरद पवारांसारखी व्यक्ती वयाच्या 82 व्या वर्षी संपूर्ण कोकणात फिरते. या कोकणात शिवसेना मोठी केली. मात्र उद्धव ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाही; मेळाव्या आधीच रामदास कदमांचा खडा?
दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाहीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2022 | 5:02 PM
Share

कृष्णकांत साळगावकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रत्नागिरी: शिवसेनेचा (shivsena) दसरा मेळावा मुंबईतील (dussehra rally) दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. हे दोन्ही मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) या दोन्ही मेळाव्यांवर खूश नाहीत. दोन मेळावे होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच रामदास कदम यांनी हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. दोन ठिकाणी वेगळा मेळावा होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे आपण समाधानी नाही. पक्ष उभा केलाय. केसेस घेतल्या आहेत. सगळं आपण भोगलंय. त्यामुळे दुःख होत आहे, अशी वेदना रामदास कदम यांनी बोलून दाखवली.

शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. त्याचं आपल्याला दुःख झालंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दोन मिळावे शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत नाही. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोकं चातकासारखे वाट बघत होते. ते विचार उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. विचार बाळासाहेब यांचेच. बाकी कुणाचे नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे फक्त अफजलखानाचा विषय आणि भाजप टार्गेट असेल, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. रामदास कदम यांनी राणेंच्या या सुरात सूर मिसळला आहे. शिवसेनाप्रमुख असते तर उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, असं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्राला वेळ दिला नाही. म्हणून हे सर्व घडलंय, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निर्णय घेत आहेत असे निर्णय मागच्या अडीच वर्षात होऊ शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

शरद पवारांसारखी व्यक्ती वयाच्या 82 व्या वर्षी संपूर्ण कोकणात फिरते. या कोकणात शिवसेना मोठी केली. मात्र उद्धव ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत