AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊतांनी रश्मी ठाकरेंना अश्लील शिव्या घातल्या होत्या’, लवकरच भांडाभोड करणार… रामदास कदम यांचा गंभीर आरोप

संजय राऊत हे मुळात शिवसैनिकच नाहीत, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. संजय राऊत तुम्ही,संपूर्ण देशासाठी आपण महाराष्ट्राला फसवत आहात...असं कदम म्हणाले.

'संजय राऊतांनी रश्मी ठाकरेंना अश्लील शिव्या घातल्या होत्या', लवकरच भांडाभोड करणार... रामदास कदम यांचा गंभीर आरोप
Image Credit source: social media
| Updated on: Feb 23, 2023 | 4:31 PM
Share

खेड, रत्नागिरी : संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) याच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचं हे कारस्थान आहे. मात्र लवकरच संजय राऊत यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. सामना वृत्तपत्राच्या संपादक पदी रश्मी ठाकरे यांच्या नियुक्ती प्रसंगी संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना अश्लील शिव्या देत होते, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले रामदास कदम हे कोकणातील अनुभवी नेते, शिवसेनेतील अनेक वर्षांपासूनच्या घटनांचे साक्षीदार मानले जातात. त्यांनीच असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

रत्नागिरीत खेड येथे पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी संजय राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांनी आधी काय काय बोललं, यावरून रामदास कदम यांनी सुनावलंय. ते म्हणाले, ‘ ‘सामना’चे संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांच्या पत्नीला अश्लील शिव्या देत होते. सामनाच्या संपादक पदी रश्मी ठाकरे यांच्या नियुक्ती प्रसंगी राऊत शिव्या देत होते. अन् आता स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य ते केवळ प्रसिद्धीसाठी करत आहेत. मी लवकरच त्यांचा भांडाफोड करणार आहे, असं खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय.

‘शिंदेंना बदनाम करण्यासाठी कारस्थान’

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी तसेच स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी संजय राऊत यांनी हे कारस्थान केलंय, असा आरोप रामदास कदम यांनी केलाय. मी आजपर्यंत त संजय राऊत यांच्यावर कधीच टीका केली नव्हती , मात्र आता डोक्यावरून पाणी जात आहे.. आता यावर बोलावंच लागेल, असं वक्तव्य कदम यांनी केलंय.

संजय राऊत यांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना अश्लील भाषेत शिव्या घातल्या होत्या, असा पुनरुच्चार रामदास कदम यांनी केला.

‘मुळात शिवसैनिक नाही’

संजय राऊत हे शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करतात, असा आरोप नेहमी केला जातो. रामदास कदम यांनी यावरूनच वक्तव्य केलंय. संजय राऊत हे मुळात शिवसैनिकच नाहीत, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. संजय राऊत तुम्ही,संपूर्ण देशासाठी आपण महाराष्ट्राला फसवत आहात…असं कदम म्हणाले.

‘संजयराव भाव ठरवतात’

राज्यातील राजकीय नेत्यांना विकत घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने रेटकार्ड तयार केलंय. तसे एजंट गावोगाव फिरत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यालाच रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ आमदार खासदार आणि नगरसेवकांचे भाव देखील संजयराव ठरवतात. संजय राऊत आता अति झालंय. अति तिथं माती होणार.. आपण कोणाचे काम करतात आपण कुणाचे भक्त आहोत हे आपल्या सर्व माहिती आहे. योग्य वेळी भांडा फोड करणार, असा इशारा रामदाक कदम यांनी दिला आहे.

Follow Us
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.
अजित पवारांच्या अपघातातील विमानाचा CDR अमेरिकेच्या... रोहित पवार नेमकं
अजित पवारांच्या अपघातातील विमानाचा CDR अमेरिकेच्या... रोहित पवार नेमकं.
शिवाजी कोण होता? पुस्तकावरून वाद चिघळला; थेट गायकवाडांच्या घरावर....
शिवाजी कोण होता? पुस्तकावरून वाद चिघळला; थेट गायकवाडांच्या घरावर.....
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा.
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार.