मोदी लाटेतही पंजाबमधील काँग्रेसचा किल्ला सुरक्षित राहण्याची कारणे काय?

चंदिगड : लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसचा किल्ला सुरक्षित ठेवणारे पंजाब एकमेव राज्य ठरले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यात काँग्रेसला 13 लोकसभा जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवून दिला. पंजाबमध्ये भाजपला 2, शिरोमणि अकाली दलाला (SAD) 2 आणि आम आदमी पक्षाला (AAP) एका जागेवर विजय मिळाला. विशेष म्हणजे भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचारानंतरही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या …

मोदी लाटेतही पंजाबमधील काँग्रेसचा किल्ला सुरक्षित राहण्याची कारणे काय?

चंदि: लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसचा किल्ला सुरक्षित ठेवणारे पंजाब एकमेव राज्य ठरले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यात काँग्रेसला 13 लोकसभा जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवून दिला. पंजाबमध्ये भाजपला 2, शिरोमणि अकाली दलाला (SAD) 2 आणि आम आदमी पक्षाला (AAP) एका जागेवर विजय मिळाला.

विशेष म्हणजे भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचारानंतरही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी प्रिनीत कौर पटियालातून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. प्रिनीत कौर यांनी शिरोमणी अकाली दल–भाजपचे उमेदवार सुरजीत सिंग यांचा 1 लाख 62 हजार 718 मतांनी पराभव केला.

मोदींच्या राष्ट्रवादाच्या रणनीतीचा मुकाबला कसा केला?

कॅप्टन अमरिंदर यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या होत्या. तसेच उमेदवारांच्या प्रचारात कमी पडल्यास त्याचा परिणाम संबंधित मंत्र्यांच्या मंत्रीपदावर पडू शकतो, असाही इशारा अमरिंदर सिंग यांनी दिला होता. अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अजेंड्याचा सामनाही ताकदीने केला. त्यासाठी त्यांनी आपल्या सैन्यातील पार्श्वभूमीचा उपयोग केला. त्यात त्यांना यशही आल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.

भाजप-शिअद सरकारच्या काळात 2015 मध्ये बेहबल कला आणि कोटकपुरा येथे गोळीबार झाला होता. त्यातील मृतांच्या स्मरणार्थ स्मृतीस्थळाच्या आश्वासनानेही भाजप-शिअदवर नकारात्मक परिणाम केला. 2015 मध्ये बेहबल कला आणि कोटकपुरा येथे झालेल्या गोळीबाराची घटना भाजप शिअदची मोठी चूक होती. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्याचा परिणाम भाजप-शिअदला या निवडणुकीत भोगावा लागला, असे मत राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केले आहे.

दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी 1984 च्या दंगलीवर सार्वजनिकपणे टीका केल्याने त्यांना याचा फायदा झाल्याचेही बोलले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *